एच ए एलमधील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:46+5:302021-07-05T04:10:46+5:30
ढोमसे यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक एच ए एल कामगार बांधवांचा देखील दुर्दैवी ...
ढोमसे यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक एच ए एल कामगार बांधवांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अकाली मृत होणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांची परिस्थिती विचारात घेता, त्यांच्या कुटुंबीयांतील वारसास नोकरी द्यावी किंवा आर्थिक मदत म्हणून दरमहा रक्कम देणारी योजना द्यावी, अशी मागणी एच ए एल कामगार संघटनेकडून करण्यात आली होती. एचएएल कामगार संघटनांच्या या मागणीला यश आले असून 'एच ए एल कुटुंब' ही भावना डोळ्यापुढे ठेवत ऐतिहासिक अशी योजना व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. या योजनेत एचएएल परिवारातील १ जानेवारी २०२० नंतर आत्महत्या वगळता कुठल्याही कारणाने मृत होणाऱ्या कामगार, अधिकारी बांधवांच्या वारसास पती, पत्नी किंवा सहचारी मृत असतील, तर २१ वर्षाखालील मुलगा, अविवाहित २५ वर्षाखालील मुलगी यांना दरमहा १५ ते २० हजार रुपये त्यांच्या वेतनश्रेणीनुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही मदत मृत कामगाराच्या सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत देण्यात येणार आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांसाठी आर्थिक साहाय्य योजना या नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेची अंमलबजावणी १ जानेवारी २०२० पासून करण्यात येणार असून त्याबाबत परिपत्रक उच्च व्यवस्थापनाने लागू केले आहे.
इन्फो
अन्य योजनेबाबतही विचार
परिवारातील कर्त्या व्यक्तीच्या जाण्याने आर्थिकदृष्ट्या निर्माण होणारी अडचण या योजनेने दूर होण्यास हातभार लागणार आहे. कामगारांच्या अकाली मृत होण्याने त्याच्या कुटुंबीयांसाठी साहाय्य म्हणून चांगली 'मासिक आर्थिक साहाय्य योजना' असावी अशी मागणी एच ए एल कामगार संघटनेकडून उच्च व्यवस्थापनाकडे सातत्याने करण्यात येत होती. याचबरोबर केंद्र सरकार, संरक्षण मंत्रालयाची दुसरी चांगली योजना आल्यास ती योजना लागू करण्याचे देखील मान्य करण्यात आले असल्याचे ढोमसे यांनी सांगितले.