गडाख टीचर्स सोसायटीकडून सभासदांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 08:45 PM2020-04-28T20:45:25+5:302020-04-28T23:02:24+5:30
सिन्नर : तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या श्री सूर्यभानजी गडाख सेकंडरी टीचर्स क्रेडिट सोसायटी, देवपूर ही सहकारी संस्था सभासदांना त्यांच्या ठेवींवर ८.५० टक्के दराने व्याज वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दौलतराव मोगल यांनी दिली.
सिन्नर : तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या श्री सूर्यभानजी गडाख सेकंडरी टीचर्स क्रेडिट सोसायटी, देवपूर ही सहकारी संस्था सभासदांना त्यांच्या ठेवींवर ८.५० टक्के दराने व्याज वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दौलतराव मोगल यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत २२५हून अधिक सभासदांना २७ लाख ४७ हजार ७१२ रुपये वाटप करण्याचे ठरले.
कोरोनामुळे सरकारने लॉकडाउन सुरू केल्याने राज्याच्या घटलेल्या उत्पन्नामुळे मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. अशा वेळी विविध प्रकारचे कर्ज, शासकीय देय रकमांचा चुकरा केल्यानंतर घरखर्चाची मोठी अडचण कर्मचाºयांना भेडसावत असतानाच टीचर्स सोसायटीच्या या निर्णयामुळे सभासदांना वेळेवर मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे संचालक मंडळाने सभासदांच्या आयडीबीआय बँकेतील वैयक्तिक खात्यावर ही रक्कम तात्काळ वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. यावेळी उपाध्यक्ष विलास पाटील, नानासाहेब खुळे, राजेंद्र मिठे, रामेश्वर मोगल, मच्छिंद्र आढाव, माधव शिंदे, अंबादास उगले, बाळासाहेब धूम, सीमा हांडगे, मंगला बोरणारे, एकनाथ खैरनार, विनायक काकुळते, व्यवस्थापक वसंत निरगुडे, वैभव गडाख, संतोष भालेराव आदी उपस्थित होते.