टोकियो आॅलिम्पिकपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:03 AM2019-05-31T01:03:58+5:302019-05-31T01:04:58+5:30

नाशिक : टोकियो येथे २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी खोटे आणि बेकायदेशीर आरोप करून आपले लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय रोर्इंगपटू दत्तू भोकनळ यांनी केला आहे.

Conspiracy to keep away from Tokyo Olympics | टोकियो आॅलिम्पिकपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र

टोकियो आॅलिम्पिकपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र

Next
ठळक मुद्देदत्तू भोकनळ : कट असल्याचा आरोप

नाशिक : टोकियो येथे २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी खोटे आणि बेकायदेशीर आरोप
करून आपले लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय रोर्इंगपटू दत्तू भोकनळ यांनी केला आहे.
दत्तू भोकनळ यांची पत्नी आशा दत्तू भोकनळ हिने दत्तूविरोधात फसवणूक केल्याची फिर्याद आडगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर दत्तू भोकनळ याला बुधवारी सत्र न्यालायाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर दत्तूने गुरुवारी (दि.३०) त्यांच्या वकीलाच्या चेंबरमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा आरोप करतानाच याची सुरुवात आपल्याकडे पैशाची मागणी करण्यापासून झाल्याचे सांगितले. याविषयीचे अधिक सत्य न्यायालयातून सर्वांसमोर येणार असल्याचे सांगितले. दत्तू भोकनळ याच्यावर त्याच्या पत्नीने आळंदी येथे आपल्याशी वैदिक पद्धतीने लग्न करून नातेवाइकांसमक्ष लग्न करण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करीत फसवणुकीची फिर्याद केली आहे.
दत्तूने दिलेल्या आश्वासनानुसार आपण व आपल्या कुटुंबीयांनी दोनदा लग्नाची तयारी करूनही दत्तूने लग्नासाठी न पोहोचता नातेवाइकांसमोर लग्नास नकार देत आपली फसवणूक केल्याचा आरोप करीत आशा भोकनळ यांनी या फिर्यादीतून केल्यामुळे दत्तू विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयाने बुधवारी दत्तूला सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करणार असल्याचे सांगतानाच सध्या आपण टोकियो आॅलिम्पिक २०२०ची तयारी करीत असून, आपल्यासमोर केवळ देशासाठी पदक मिळविण्याचेच ध्येय आहे़
-दत्तू भोकनळ, रोर्इंगपटू

Web Title: Conspiracy to keep away from Tokyo Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक