दोन हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 01:35 AM2022-06-13T01:35:16+5:302022-06-13T01:36:15+5:30

नाशिक : ओझर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून नियुक्त असलेेले संशयित कारभारी भिला यादव (५२, रा.नरहरीनगर, पाथर्डीफाटा) यांना तक्रारदाराकडून ...

Constable caught taking bribe of Rs 2,000 | दोन हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात

दोन हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देओझर पोलीस ठाण्यात नियुक्ती पंचवटीत घेतले ‘एसीबी’च्या पथकाने ताब्यात

नाशिक : ओझर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून नियुक्त असलेेले संशयित कारभारी भिला यादव (५२, रा.नरहरीनगर, पाथर्डीफाटा) यांना तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पंचवटीतील सीतागुंफा परिसरात एसीबीच्या पथकाने रविवारी (दि.१२) सापळा रचला होता. याप्रकरणी यादव यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदाराकडे संशयित यादव यांनी केली होती. न्यायालयाने तक्रारदाराला पकड वॉरंट बजावले होते. त्यानुसार यादव यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला व त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पकड वॉरंटमध्ये जामीनदार यांचे कागदपत्रे घेऊन सहकार्य करण्याचे आमिष दाखविले. त्या मोबदल्यात यादव यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. यानंतर पथकाने खात्री पटविली आणि पंचवटीतील सीतागुंफा परिसरात रविवारी सापळा रचला. यादव यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना पथकाने ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक साधना इंगळे, अंमलदार सचिन गोसावी, नितीन कराड, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने ही सापळा कारवाई केली.

Web Title: Constable caught taking bribe of Rs 2,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.