मालेगावी राकॉँतर्फे संविधान जागर सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 06:14 PM2018-08-19T18:14:12+5:302018-08-19T18:15:22+5:30
मालेगाव : नवी दिल्ली येथे काही कार्यकर्त्यांनी संविधानाची होळी केली. त्याच्या निषेधार्थ मालेगावी राष्टÑवादी काँग्रेसतर्फे संविधान जागर सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
मालेगाव : नवी दिल्ली येथे काही कार्यकर्त्यांनी संविधानाची होळी केली. त्याच्या निषेधार्थ मालेगावी राष्टÑवादी काँग्रेसतर्फे संविधान जागर सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
संविधानाच्या उद्देशिकेची प्रत जनजागृतीसाठी नागरिकांना वाटण्यात आली. यावेळी राजेंद्र भोसले म्हणाले, संविधान प्रतीची होळी करण्यात आली. अद्याप त्या कार्यकर्त्यावर कारवाई केली गेली नाही. याचाच निषेध करण्यासाठी भारतीय संविधानाचे महत्व प्रत्येक भारतीयांना समजावे यासाठी पक्षातर्फे जनजागर सप्ताह राबवण्यात येत आहे.
या सप्ताहाअंतर्गत शहरातील मोसमपूल, कॅम्प रस्ता, एकात्मता चौक या परिसरात संविधानाच्या प्रती नागरिकांना वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमात राकाँचे विनोद चव्हाण, युवक अध्यक्ष दिनेश ठाकरे, अनंत भोसले, किशोर इंगळे, निलेश पाटील, अशोक चौधरी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.