राष्टÑ सेवा दलातर्फे संविधान जागर अभियानाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:01 PM2017-11-26T23:01:22+5:302017-11-27T00:32:58+5:30
संविधान दिनानिमित्त येथे राष्टÑ सेवा दलाच्या वतीने संविधान जागर अभियानाला प्रारंभ झाला. मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहरातून रॅली काढण्यात आली.
संगमेश्वर : संविधान दिनानिमित्त येथे राष्टÑ सेवा दलाच्या वतीने संविधान जागर अभियानाला प्रारंभ झाला. मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहरातून रॅली काढण्यात आली. शिवाजी महाराज पुतळामार्गे ही रॅली आंबेडकर पुतळ्यापाशी आली. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी सेवा दल सैनिक तेजस्विनी पवार हिने संविधानाचे महत्त्व विशद केले. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात यानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. विद्यार्थिनी अवनी वाणी व साक्षी वाघ यांनी संविधानातील कर्तव्याचे वाचन करून ते समजून सांगितले. उपस्थित सर्वांना संविधानाची प्रतिज्ञा देण्यात आली. संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार आणि आपली कर्तव्ये याचे भान प्रत्येक भारतीयाला असले पाहिजे. मात्र आज काही हिंसक लोकांतर्फे संविधानाने दिलेली हमी व मूल्येच धोक्यात आणली जात आहेत. ती मोडून काढण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. अशावेळी संविधानातील मूल्यांप्रती सजग राहण्यासाठी राष्टÑ सेवा दलातर्फे महाराष्टÑभर २६ नोव्हें. ते २६ जानेवारी २०१८ असे दोन महिने जागर अभियान राबविले जात असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. भास्कर तिवारी यांनी यावेळी सांगितले. डॉ. सुगन बरंठ यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक फराटे, संतोष पवार, प्रवीण वाणी, राजेंद्र जाधव, राजीव वडगे, सुभाष परदेशी, राजेंद्र भोसले, किरण सोनवणे, प्रवीण गायकवाड, सुधीर साळुंके, अशोक पठाडे, विकास मंडळ आदींसह कॅम्प व संगमेश्वर शाखेतील सैनिक उपस्थित होते.
कार्यकर्त्यांचा मेळावा
संगमेश्वर : इतर मागासवर्गीय समाजासाठी क्रांतिकारी ठरलेला मंडल आयोग आंदोलन तसेच मराठवाडा विद्यापीठास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिनी आयोजित केला आहे. सत्यशोधक युवा सभा, सम्राट मंडळ व समविचारी संस्था, पथ संघटना यांच्या सहकार्याने हा अभिनव मेळावा होणार आहे. मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, सिन्नर, नाशिक येथील सुमारे शंभरावर कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहतील. दिवसभर कार्यकर्त्यांचे स्नेहसंमेलन होईल, अशी माहिती संयोजक सुभाष परदेशी यांनी दिली. सायंकाळी ५ वाजता ‘क्रांतिकारी महात्मा’ हा एकपात्री प्रयोग प्रा. नवनाथ शिंदे (कोल्हापूर) सादर करतील.