संविधान हेच माझे शस्त्र : दुर्गा गुडिलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:54 AM2019-12-22T00:54:07+5:302019-12-22T00:54:28+5:30

जातपंचायतीच्या दहशतीखाली जगणाऱ्या वैदू समाजाला त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी लढा उभारणाºया मुंबईच्या जोगेश्वरी येथील युवा समाजसेवक दुर्गा गुडिलू यांना ‘नयनतारा सहगल प्रेरणा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 The Constitution is my weapon: Durga Gudilu | संविधान हेच माझे शस्त्र : दुर्गा गुडिलू

संविधान हेच माझे शस्त्र : दुर्गा गुडिलू

Next

नाशिक : जातपंचायतीच्या दहशतीखाली जगणाऱ्या वैदू समाजाला त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी लढा उभारणाºया मुंबईच्या जोगेश्वरी येथील युवा समाजसेवक दुर्गा गुडिलू यांना ‘नयनतारा सहगल प्रेरणा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शहरातील गीताई फाउण्डेशनच्या वतीने गीताबाई देवराम आहिरे स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणाºया पुरस्काराचे हॉली क्रॉस चर्चमध्ये शनिवारी (दि.२१) वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अ‍ॅड. सुरेश भटेवरा, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळाच्या (मासूम) संस्थापक डॉ. मनीषा गुप्ते, कीर्ती चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानपत्र, अकरा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. दुर्गा यांनी आपल्या मातोश्री अंकुबाई गुडिलू यांच्या सोबतीने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी दुर्गा म्हणाल्या, समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरेविरुद्ध लढताना पुरुषी मानसिकतेचा मला सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, मात्र लढ्यात मी संविधानाला शस्त्र बनविले. लहानपणापासूनच समाजात घडणाºया वाईट गोष्टींची मनात चीड निर्माण झाली होती. चळवळींचे आकर्षण असल्याने परिवर्तनाची मशाल पेटविण्याची खूणगाठ बांधली आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरले. आमचा वैदू समाज हा भटक्या विमुक्तांमधील असून, या समाजाच्या शिक्षणापासूनच्या विविध समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी माझी लढाई निरंतर सुरू राहणार आहे. ‘गीताई’चा आशीर्वाद आणि सहगल पुरस्कार मला यासाठी बळ देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान, भटेवरा यांनीही समाजातील वाईट प्रवृत्तींवर प्रकाश टाकला.
यावेळी चळवळीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. फाउण्डेशनच्या अनिता पगारे यांनी प्रास्ताविक केले. मनोहर अहिरे यांनी सूत्रसंचालन तर आभार कल्याणी पगारे यांनी मानले.
वैदू समाजात परिवर्तनाची मशाल पेटविणाºया दुर्गाचे कार्य अलौकिक आहे. या समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, चालीरितींविरुद्ध लढा देणे इतके सोपे नव्हते; मात्र दुर्गाने आपल्यातील दुर्गारूप दाखवून देत अन्यायाला वाचा फोडली. तळागाळातील समाजाला मूळ प्रवाहात आणणाऱ्यांच्या पाठीशी ‘गीताई’सारख्या विविध संस्थांनी उभे काळाची गरज आहे.
- सुरेश भटेवरा, ज्येष्ठ पत्रकार

Web Title:  The Constitution is my weapon: Durga Gudilu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक