बांधकामांसंदर्भातील नियमावली अन्यायकारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:18 AM2019-04-24T01:18:05+5:302019-04-24T01:19:05+5:30
राज्य शासनाच्या वतीने सर्व शहरांसाठी एकसारखी नियमावली तयार करण्यात आली असली तरी ती नाशिककरांवर अन्याय करणारी आहेच, परंतु अनेक तरतुदी अव्यवहार्यदेखील आहेत, अशा प्रकारची मते नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी सप्रमाण नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडे मांडली आहे.
नाशिक : राज्य शासनाच्या वतीने सर्व शहरांसाठी एकसारखी नियमावली तयार करण्यात आली असली तरी ती नाशिककरांवर अन्याय करणारी आहेच, परंतु अनेक तरतुदी अव्यवहार्यदेखील आहेत, अशा प्रकारची मते नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी सप्रमाण नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडे मांडली आहे.
नाशिकमधील संघटनांनी तब्बल २८१ हरकती आणि सूचना केल्या आहेत. त्या आधारे सुनावणी सुरू झाली असून, ती २ मे पर्यंत चालणार आहे. त्यात नाशिकसह विभागातील अन्य महापालिका क्षेत्रातील बांधकाम संघटनादेखील त्यांची बाजू मांडणार आहेत.
राज्यात अनेक महापालिकांमध्ये वेगवेगळे बांधकामांसंदर्भातील नियम आहेत. केंद्र शासनाने आता सर्व शहरासाठी समान बांधकाम नियमावली तयार करण्याची तयारी केली असून, राज्य शासनाला तसे आदेश दिल्यानंतर त्यांनी कार्यवाही सुरू केली. गेल्या ८ मार्च रोजी यासंदर्भात राज्य शासनाने अधिसूचना प्रसिध्द करून प्रस्तावित बांधकाम नियमावलीवर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. परंतु या नियमावलीत