समता, न्याय, बंधुतेची मूल्ये रु जवण्यात संविधानाचे स्थान महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 04:58 PM2018-11-27T16:58:44+5:302018-11-27T16:59:31+5:30

येवला : दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजीभारताने संविधान स्वीकारले माणूस केंद्र बिंदू ठेवून घटनासमितीने जी मूल्य संविधानात आणली होती ती मूल्ये समता, न्याय, बंधुतेची मूल्ये या आठरा पगड देशाच्या जडण-घडणीत फार महत्वाची ठरली होती, तथापि सुरु वातीची काही वर्षे सोडली तर संविधानातील सामाजिक, आहृतिक, राजकीय आणि धर्मिनरपेक्ष लोकशाही समाजवादाची मूल्ये नाकारून हित संबंध दुखावत असलेल्या विशिष्ट समूहाने जाणीवपूर्वक आपआपलेच प्रस्थापित विचारांचे अजेंडे राबविण्यास सुरु वात केल्यामुळे भारतीय संविधानासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी आणि बडोदा येथील अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येवले येथे बोलतांना केले.

 Constitutional status is important in addressing equality, justice and brotherhood values | समता, न्याय, बंधुतेची मूल्ये रु जवण्यात संविधानाचे स्थान महत्वाचे

  येवल्याच्या प्रागतिक व्याख्यानमालेत   अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख . 

Next
ठळक मुद्दे लक्ष्मीकांत देशमुख:येवल्यात प्रागतिक व्याख्यामालेस प्रारंभ


शहरातील विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान ग्रँथ पालखीत ठेऊन ही संविधान दिंडी महात्मा फुले नाट्यगृह येथे आणण्यात आली. महात्मा फुले नाट्यगृहात समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे उदघाटन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमापवार, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषाशिंदे, जेष्ठ साहित्यीक प्रा. गो. तु. पाटील, सागर मगर आदींच्या हस्ते रोपट्याला पाणी टाकून करण्यात आले. यावेळी सुंदर ते ध्यान या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर मायबोली मूक बधिर विद्यालयातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. यावेळी प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुंफले. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भावदेण्याच्या वलग्ना अनेकानी केल्या. मात्र उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यास व्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे शेतकºयांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी आर्थिक सक्षम झाल्यास गरीब श्रीमंत दरी कमी होईल. संविधानाने सर्वांनाभारतीय असल्याची ओळख दिली आहे. आज या संविधानालाच आव्हान दिले जाते. ही बाब देशाच्या सार्वभौम त्वाला बाधा आणणारी आहे. गाय वाचवण्यासाठी झुंडशाहीने माणसाला मारणे चूकच आहे, याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल देशमुख यांनी यावेळी केला.
यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, मविप्र संचालक रायभान काळे, प्रा. शिरीष गंधे, डॉ. एस.के पाटील,आदी उपस्थित होते.
प्रस्ताविक समता प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा प्रा.अर्जुन कोकाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्राचार्य भाऊसाहेब गमे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अजय विभांडीक यांनी करून दिला. आभार मंदा पडवळ यांनी मानले.

Web Title:  Constitutional status is important in addressing equality, justice and brotherhood values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.