पंचवटीत आठ घरांचे बांधकाम हटविले

By admin | Published: June 28, 2016 12:18 AM2016-06-28T00:18:28+5:302016-06-28T00:19:06+5:30

अतिक्रमण : महिलांनी ओतले अंगावर रॉकेल

The construction of eight houses in Panchvati was deleted | पंचवटीत आठ घरांचे बांधकाम हटविले

पंचवटीत आठ घरांचे बांधकाम हटविले

Next

 पंचवटी : शासनाने समाजकल्याण विभागासाठी आरक्षित केलेल्या राजवाडा येथील भूखंडावर अनधिकृतपणे थाटलेल्या आठ घरांचे अतिक्र मण सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हटविण्यात आले आहे. दरम्यान, अतिक्र मण हटवू नये यासाठी विरोध करणाऱ्या तीन ते चार महिलांनी अंगावर रॉकेल ओतून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
राजवाडा येथील सर्व्हे क्र मांक ५८६५/१७ वरील ५४४ चौरस मीटर जागा शासनाने १९९२ रोजी एका व्यक्तीकडून भूसंपादन करीत ती समाजकल्याण विभागाला अधिग्रहण करण्यात आली होती. शासनाने आरक्षित केलेल्या या जागेवर गेल्या अनेक दिवसांपासून काही नागरिकांनी अनिधकृतपणे घरांचे बांधकाम केले होते. सदरच्या जागेवरील घरांचे बांधकाम हटविण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या. मात्र तरीदेखील जागा खाली न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे प्रांत के. मंजूलक्ष्मी, तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी सांगितले. जेसीबी यंत्राच्या सहाय्याने अतिक्र मण हटविण्यास सुरुवात करीत असताना तीन ते चार महिलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करून अंगावर रॉकेल ओतून घेतले. सदर घटना सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या महिलांना ताब्यात घेतले.

Web Title: The construction of eight houses in Panchvati was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.