कडवा नदी पुलाच्या बांधकामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 05:59 PM2019-01-21T17:59:59+5:302019-01-21T18:04:58+5:30

सर्वतीर्थ टाकेद: इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे आज कडवा नदी पुलाच्या बांधकामाला आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, विमल गाढवे, मोहन बर्हे, साहेबराव झनकर, नंदू गाढवे, संपत काळे, सरपंच बाळासाहेब घोरपडे, रामचंद्र परदेशी, नामदेव गाढवे, गणेश टोचे, संपत रोंगटे, आदि उपस्थित होते.

 Construction of Kadwa river bridge started | कडवा नदी पुलाच्या बांधकामास प्रारंभ

कडवा नदी पुलाच्या बांधकामास प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्दे टाकेद जवळील पावसाळ्यात या पुलावरून पाणी असल्याने शाळकरी मुले, वाहनधारक यांना जुन्या पुलावरून मोठी कसरत करावी लागते, आमदार वाजे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर नवीन पूल होणार असल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.


सर्वतीर्थ टाकेद: इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे आज कडवा नदी पुलाच्या बांधकामाला आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, विमल गाढवे, मोहन बर्हे, साहेबराव झनकर, नंदू गाढवे, संपत काळे, सरपंच बाळासाहेब घोरपडे, रामचंद्र परदेशी, नामदेव गाढवे, गणेश टोचे, संपत रोंगटे, आदि उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांपासून खावटी कर्ज बंद आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकº्यांची व मजुरांची उपासमार थांबण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. टाकेद सर्कलमध्ये विकासाला चालना देण्यासाठी सर्वानी एकत्र यावे असे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी केले. टाकेद बुद्रुक येथे विकास कामाचे भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. अधरवड ते म्हैस वळण घाट रस्ता प्रजीमा२४ टाकेद बु. गावाजवळील कडवा नदी पुलाचे बांधकामासाठी १.२७कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
दळणवळणासाठी महत्वाच्या असणाº्या टाकेद खुर्द ते तातळेवाडी मजबुतीकरण व डांबरीकरण करणे एक कोटी रु पयांच्या कामाचे भूमिपूजन झाले. योजनांच्या आराखड्यातून सर्वच कामे लवकरच मार्गी लागणार असल्याचे आमदार वाजे यांनी सांगितले. टाकेद जवळील पावसाळ्यात या पुलावरून पाणी असल्याने शाळकरी मुले, वाहनधारक यांना जुन्या पुलावरून मोठी कसरत करावी लागते, आमदार वाजे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर नवीन पूल होणार असल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.

सार्वजनिक बांधकाम विभागा चे सहाय्यक अभियंता
कौस्तुभ पवार, शाखा अभियंतायोगेश गोडसे, के.के. बिन्नर, हेमंत दिघोळे, शांताराम भांगे, नंदू जाधव, संग्राम वारु ंगसे, रतन बांबळे, साहेबराव लगड, ग्रामविकास अधिकारी इंगळे, गुलाब भले, कमलाकर सांबरे, भगवान जुंदरे, ज्ञानेश्वर लगड, भगवान जुंदरे
शिवसेना युवासेना पदाधिकारी, शाखाप्रमुख व टाकेद सर्कलमधील सर्व शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Construction of Kadwa river bridge started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.