नाशिकमध्ये फ्लॅट नूतनीकरणावेळी जुन्या बिल्डिंगचे बांधकाम कोसळले; दोन मजूर गंभीर जखमी
By अझहर शेख | Updated: June 3, 2024 18:39 IST2024-06-03T18:37:04+5:302024-06-03T18:39:29+5:30
राजेंद्र सुकदेव निळे (३९), राजेश प्रकाश शिरसाठ (४५) असे जखमी झालेल्या मजूरांची नावे आहेत.

नाशिकमध्ये फ्लॅट नूतनीकरणावेळी जुन्या बिल्डिंगचे बांधकाम कोसळले; दोन मजूर गंभीर जखमी
मनोज मालपाणी, नाशिकरोड: दत्तमंदिररोड भागातील श्री घैसास दत्त मंदिरामागे असलेल्या अत्रेय अपार्टमेंटच्या तीसऱ्या मजल्यावरील जुन्या फ्लॅटचे नूतनीकरण केले जात होते. यावेळी अनधिकृत बांधकाम अचानकपणे कोसळल्याची घटना सोमवारी (दि.३) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन बांधकाम मजूर गंभीररित्या जखमी झाले आहे. एक मजुर खालच्या फ्लॅटच्या खिडकीवर आच्छादन असलेल्या पत्र्याच्या शेडवर अडकल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले. राजेंद्र सुकदेव निळे (३९), राजेश प्रकाश शिरसाठ (४५) असे जखमी झालेल्या मजूरांची नावे आहेत.
गायखे कॉलनी रस्त्यावरील अत्रेय अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर गेल्या तीन महिन्यांपूर्वीच रवि काजळे यांनी जुना फ्लॅट विकत घेतला होता, असे येथील रहिवाशांनी सांगितले. त्या फ्लॅटचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. फ्लॅटच्या दोन्ही बाजूला असलेल्या गॅलरीची भिंत तोडून खोलीचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र वाढीव खोलीच्या बाहेरील बाजूने फ्लॅट नूतनीकरण करताना कमकुवत लहान सळ्या बांधकामासाठी वापरून सज्जा तयार करण्यात आला होता.
नेहमीप्रमाणे फ्लॅटमध्ये दोन-तीन मजूर बांधकाम करत होते. यावेळीि रस्त्याच्या बाजूने असलेले अनाधिकृत पक्के बांधकामाच्या ठिकाणी दोन मजूर काम करत असताना अचानक ते सर्व बांधकाम खाली कोसळले.
यामुळे एक मजूर तिसऱ्या मजल्यावरून खाली रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला.