ऑक्सिजन पार्कची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:03+5:302021-07-05T04:11:03+5:30
नाशिक : ऑक्सिजनच्या कमतरतेने काय होऊ शकते, त्याचा प्रत्यय सर्वांनीच कोविड काळात अनुभवला. त्यामुळे प्रत्येकालाच आता ऑक्सिजनचे महत्त्व कळले ...
नाशिक : ऑक्सिजनच्या कमतरतेने काय होऊ शकते, त्याचा प्रत्यय सर्वांनीच कोविड काळात अनुभवला. त्यामुळे प्रत्येकालाच आता ऑक्सिजनचे महत्त्व कळले असले तरी त्यासाठीची प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न यशस्विनी सामाजिक अभियान आणि झेप बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे . या विचारातूनच कोणार्क नगरला ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात येत आहे.
प्राणवायूचा मुबलक पुरवठा करणारी झाडं लावून नाशिकच्या या पहिल्या ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली जाणार आहे. कोणार्कनगर येथील, डी. पी. रोड जॉगिंग ट्रॅकजवळ या ऑक्सिजन पार्कसाठीची सज्जता करण्यात आली आहे. त्याचा पहिला टप्पा केवळ ऑक्सिजनची सर्वाधिक निर्मिती करणाऱ्या वृक्षारोपणाने करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये निसर्ग सौंदर्य आणि पर्यावरणाला अनन्य साधारण महत्व आहे. त्याच पर्यावरणाचे भान राखून जास्तीत जास्त लोकांनी आपली दिनचर्या तयार करावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्याच प्रयत्नांना मूर्त स्वरूप देण्याचा पहिला उपक्रम म्हणजे हा ऑक्सिजन पार्क आहे. तसेच या परिसरातील नागरिक त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सोहळ्यांनिमित्त या ठिकाणी येऊन वृक्षारोपण करतील असे स्वरूप त्याला भविष्यात प्रदान करण्याचा आयोजकांचा मानस असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा सुनीता निमसे यांनी सांगितले.