आठ दिवसापुर्वीच केलेले पाण्याच्या टाकीचे बांधकाम ढासळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:44 PM2018-11-20T17:44:10+5:302018-11-20T17:45:22+5:30

औंदाणे : (ता.बागलाण) येथील ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगातून गावाला पाणीपुरवठा करणारी सुमारे सहा हजार लिटर पाण्याच्या टाकीचे आठ दिवसा पुर्वीच काम केले व पहिल्याच दिवशी दहा लिटर पाणी टाकताच बांधकाम ढासळल्याने निकृष्ट दर्जामुळे आठदिवसातच काम ढासळल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

The construction of the tank of eight days had already collapsed | आठ दिवसापुर्वीच केलेले पाण्याच्या टाकीचे बांधकाम ढासळले

औदाणे येथील गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याच्या टाकीचे बाधकाम आठ दिवसात मध्यभागी पडल्याने हया बांधकामाची पाहणी करताना माजी सभापती चिला निकम.

Next
ठळक मुद्देलोखंड कमी प्रमाणात वापरुन काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे निदर्शनास आले

औंदाणे : (ता.बागलाण) येथील ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगातून गावाला पाणीपुरवठा करणारी सुमारे सहा हजार लिटर पाण्याच्या टाकीचे आठ दिवसा पुर्वीच काम केले व पहिल्याच दिवशी दहा लिटर पाणी टाकताच बांधकाम ढासळल्याने निकृष्ट दर्जामुळे आठदिवसातच काम ढासळल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
येथील गावाला पाणीपुरवठा ग्रामपंचायतीची करणारी हतीनदीत विहीर असुन पहीली जुनी पाणीपुरवठा करणारी सुमारे पाच हजारलिटर पाण्याची टाकी आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून ग्रामपंचायतीने १४ वित्त आयोगातून नवीन पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले. सदर बांधकाम आठ दिवसांपुर्वीच पुर्ण झाले, मात्र पाहिल्याच दिवशी १० लीटर पाणी टाकताच मध्यभागी बांधकाम ढासळले.
पाण्याच्या टाकीला फाऊंडेशन मजबुत नबांधल्याने व लोखंड कमी प्रमाणात वापरुन काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे निदर्शनास आले आहे. कमी दर्जाच्या साहित्यामुळे हे बांधकाम पडले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
महिला व मुले येथे पाणी भरण्यासाठी येतात पुर्ण बांधकाम पडले असते तर मोठा अनर्थ घडला असता. या कामाची चौकशी करुन नवीन उत्तम दर्जाची पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

येथील ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगातून आठ दिवसापूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकामकेले वपाहिल्याच दिवशी मध्यभागी हे बाधंकाम पडले मी स्वत: सदस्य असतानाही मला विश्वासात घेतले गेले नाही हया!. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी
- शर्मिला गोसावी, ग्रामपंचायत सदस्य.
येथील ग्रामस्थांना पाणीन मिळताच आठ दिवसापुर्वी टाकीचे केलेले बांधकाम मध्यभागी पडले व पाणी वाया गेले हे काम चांगल्या प्रतीचे हाणे गरजेचे होते.
- प्रकाश निकम, माजी चेअरमन, विविध. कार्यकारी सोसायटी.

फोटो :
वाया गेलेले पाणी.

Web Title: The construction of the tank of eight days had already collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.