सिन्नर येथे दोन वीज उपकेंद्रांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:14 PM2018-06-25T23:14:54+5:302018-06-25T23:16:21+5:30

सिन्नर : शहराला पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी ३३ केव्हीए क्षमतेच्या दोन वीज उपकेंद्रांची निर्मिती केली जात असून, त्याची कामे प्रगतीवर आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर, उपनगरे एकाचवेळी अंधारात जाण्याची समस्या निर्माण होणार नाही तसेच खंडित वीजपुरवठ्यापासूनही सिन्नरकरांची सुटका होणार आहे.

Construction of two power sub-stations at Sinnar | सिन्नर येथे दोन वीज उपकेंद्रांची उभारणी

सिन्नर येथे दोन वीज उपकेंद्रांची उभारणी

Next
ठळक मुद्देवीजपुरवठा : दहा वर्षांची सुटणार समस्या

सिन्नर : शहराला पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी ३३ केव्हीए क्षमतेच्या दोन वीज उपकेंद्रांची निर्मिती केली जात असून, त्याची कामे प्रगतीवर आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर, उपनगरे एकाचवेळी अंधारात जाण्याची समस्या निर्माण होणार नाही तसेच खंडित वीजपुरवठ्यापासूनही सिन्नरकरांची सुटका होणार आहे.
शहरासाठी दोन वीज उपकेंद्रांची कामे सुरू आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आमदार राजाभाऊ वाजे यांनी उपकेंद्रांची मागणी केली होती. प्रत्यक्षात दोन्ही केंद्रांवर ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. येत्या तीन महिन्यांत उपकेंद्र कार्यान्वित होऊन सिन्नर शहरातील विजेच्या समस्या निकाली निघतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहर व उपनगरांचा विस्तार वाढल्याने वीज समस्येने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहत व सेझमुळे शहराचा विस्तार वेगाने झाला. वीज मागणीतही त्याच वेगाने भर पडली. त्यामुळे सध्याच्या अस्तित्वातील १३२ केव्हीए केंद्रातून होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होण्याबरोबरच शहर व उपनगरे एकाचवेळी अंधारात जाण्याचे प्रकार नियमित घडत आहेत.
५ मेगावॉट क्षमतेचे ट्रान्सफार्मर आडवा फाटा येथे व सरदवाडी जवळील पांगरवाडीत असे ३३ केव्हीए क्षमतेचे दोन उपकेंद्र उभारणीचे काम प्रगतीवर आहे. प्रत्येकी ५ मेगावॉटचे दोन ट्रान्सफार्मर यात बसविण्यात आले आहेत. २० मेगावॉटची क्षमता या केंद्रात उपलब्ध होणार असल्याने पुढील १० वर्षे शहराला पुरेशा दाबाने वीजपुरवठा होऊ शकेल. नवीन उपकेंद्रातील चारही ट्रान्सफार्मर शहर, उपनगरांचे भाग विभागणी करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी बिघाड झाल्यास केवळ एक रोहित्र बंद करता येईल. त्यामुळे अन्य तीन भागातील पुरवठा बंद करण्याची वेळ वीज कर्मचाऱ्यांवर येणार नाही. त्यामुळे एकाच वेळी शहर, उपनगरे अंधारात जाण्याची समस्या सुटणार आहे.

Web Title: Construction of two power sub-stations at Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.