सटाण्यात विहिरीचे बांधकाम कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 06:02 PM2018-08-03T18:02:13+5:302018-08-03T18:02:35+5:30
सटाणा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातील विहिरीचे गेल्या चार महिन्यांपूर्वी लाखो रु पये खर्चून केलेले बांधकाम अचानक कोसळल्याने शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. या निकृष्ट दर्जाच्या विहीर बांधकामाची चौकशी करून संबधित ठेकेदाराविरु द्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
शहरासाठी तालुक्यातील ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून पालिकेने ६८ लाख ८१ हजार रु पये खर्चून नदीपात्रात नव्याने विहीर खोदण्यात आली. या ९ मीटर व्यास असलेल्या विहिरीच्या बांधकामासाठी पालिकेने चाळीस लाख रुपयांची निविदा काढली होती. गेल्या चार महिन्यांपुर्वी संबधित ठेकेदाराने हे बांधकाम पूर्ण केले. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी अचानक बांधकाम कोसळल्याने विहीर मातीने भरून आली आहे. या विहिरीतून पाणीपुरवठा होत नाही म्हणून माजी पाणीपुरवठा सभापती मुन्ना शेख यांनी अचानक विहिरीची पाहणी केल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. तांत्रिकदृष्टया या विहिरीचे काम सदोष असल्यामुळे विहिरीला भगदाड पडून बांधकाम कोसळल्याचे उघडकीस आले. नदीला पूर आल्याने बांधकाम पूर्णपणे कोसळून विहीर मातीने भरून आली आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पालिकेचे एक कोटी ९ लाख रु पये अक्षरश: पाण्यात गेले असून सबंधित कामाची चौकशी करावी अशी मागणी पुढे आली आहे.
एका विहिरीवर कोटीहून अधिक रु पये पालिकेने खर्च केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याच नदीपात्रात अनेक शेतकºयांच्या विहिरी आहेत. पालिकेने एका विहिरीवर केलेल्या खर्चात शेतकरी अशा पाच विहीर खोदून शेतात पाईप लाईनने पाणी नेल्याची उदाहरणे ेआहेत. मात्र पालिकेने एवढा खर्च करूनही पाणी निघू न शकल्याने पालिका प्रशासन संशयाच्या भोवºयात सापडले आहे. विहिरी खोलाई ,बांधकाम , पंप खरेदी हे प्रशासनासाठी कुरण असल्याचेही बोलले जात आहे.
कोट...
अधिकारी, पुढारी आणि ठेकेदार या त्रिकुटामुळेच पालिकेचे एक कोटी रु पये अक्षरश: वाया गेले आहेत.या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करून संबधित ठेकेदाराविरु द्ध गुन्हा दाखल करावा .हा जनतेचा पैसा असून निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेची एकप्रकारे फसवणूक केली आहे.
- मनोज सोनवणे, माजी नगरसेवक
विहिरीच्या बांधकामाची मुख्याधिकारी व संबंधित अधिकाºयांना सोबत घेऊन पाहणी केली आहे. बांधकामाबद्दल संबधित ठेकेदाराला तंबी दिली आहे.नदीला पूर असल्यामुळे काम करण्यास मोठा अडथळा येत असून काम पूर्ण होईपर्यंत संबधित ठेकेदाराचे उर्वरित बिल रोखण्यात आले आहे.
- सुनील मोरे, नगराध्यक्ष, सटाणा