नांदगावी नवीन पादचारी पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:26 PM2020-02-21T23:26:04+5:302020-02-22T01:22:36+5:30

नांदगाव येथील रेल्वेस्थानकावर असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पूल लवकरच इतिहासजमा होणार असून, त्यापासून काही अंतरावर नवीन अधिक क्षमतेचा पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.

Construction work on a new pedestrian bridge started in Nandgavi | नांदगावी नवीन पादचारी पुलाचे काम सुरू

नांदगावी नवीन पादचारी पुलाचे काम सुरू

Next
ठळक मुद्देआता उरल्या आठवणी : ब्रिटिशकालीन पादचारी पूल इतिहासजमा

नांदगाव : येथील रेल्वेस्थानकावर असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पूल लवकरच इतिहासजमा होणार असून, त्यापासून काही अंतरावर नवीन अधिक क्षमतेचा पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.
सध्या उपयोगात असलेल्या ब्रिटिशकालीन पादचारी पुलावर त्याकाळी ज्या कंपनीने तो बनविला होता, त्या कंपनीचे नाव आहे. ते असे ‘जोसेफ वेस्टवूड लिमिटेड इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रक्टर लंडन’ त्याखाली १९०४ असे साल टाकण्यात आलेले आहे. त्याला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा सदर ब्रिटिश कंपनीकडून रेल्वेला पत्र आले. ‘आम्ही दिलेल्या हमीनुसार पुलाचे आयुष्य आता संपले आहे. यापुढे आमची जबाबदारी उरली नाही’ अशा आशयाचे ते पत्र होते. कामाची जबाबदारी १०० वर्षे घेणाऱ्या ब्रिटिश कंपनीच्या त्या पत्राची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर २०२० पर्यंत लाखो प्रवाशांना आपल्या अंगावरून वाहणारा हा पूल अद्यापही दिमाखात उभा आहे. पुलाच्या कठड्यावर अलीकडे सुरक्षेसाठी जाळी लावण्यात आल्याने कंपनीचे नाव जाळीमागे गेले आहे. एकेकाळी धुरांच्या रेषा सोडत येणारी मामाची गाडी. ज्यांनी या पुलावर उभे राहून बघितली होती. त्यांच्या फक्त आठवणी उरणार आहेत.
एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर नवीन पुलाचा पाया खणण्याचे काम सुरू झाले आहे. तो सध्याच्या पुलापेक्षा अधिक रु ंद व भव्य असेल, मात्र त्या पुलाचा रस्ता शहरातून येणाऱ्यांसाठी काहीसा दूर मालधक्क्यातून येणारा असणार आहे. दोन नंबरच्या फलाटावर अप बाजूचा सिग्नल मागे सरकणार आहे.

Web Title: Construction work on a new pedestrian bridge started in Nandgavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे