येवल्यातील बांधकाम उपअभियंता लाच घेताना जाळ्यात

By admin | Published: June 19, 2014 12:28 AM2014-06-19T00:28:04+5:302014-06-19T00:54:22+5:30

आंबेगाव : ठेकेदाराकडून २५ हजारांची लाच घेताना जिप बांधकाम विभागाचे येवला उपअभियंता वसंत बबन वाईकर यांना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

Construction of Yavali sub-engineers caught in bribe | येवल्यातील बांधकाम उपअभियंता लाच घेताना जाळ्यात

येवल्यातील बांधकाम उपअभियंता लाच घेताना जाळ्यात

Next

आंबेगाव (ता. येवला) : येथील स्मशानभूमी व गाव रस्त्यांचे बारा लाखांचे देयक मंजुरीसाठी ठेकेदाराकडून २५ हजारांची लाच घेताना जिल्हा परिषद (इवद) बांधकाम विभागाचे येवला उपअभियंता वसंत बबन वाईकर यांना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत वाईकर यांना अटक करण्यात येणार असल्याचे लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक नजीर शेख यांनी सांगितले.
वसंत वाईकर हे १७ जून २०१३ रोजी येवला येथे उपअभियंता म्हणून रुजू झाले. आज बरोबर एक वर्षानंतर ते लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकले. मनोज शांताराम गिते (रा. आंबेगाव) या बांधकाम ठेकेदाराने आंबेगाव (ता. येवला) येथे स्मशानभूमीच्या काँक्रीटीकरणाचे पाच लाखाचे व गावातील प्रभाग क्र. ३, ४ व ५ मधील रस्ता काँक्रीटीकरणाचे सात लाखांचे असे एकूण बारा लाखांचे देयक मंजुरीसाठी उपअभियंता वाईकर यांच्याकडे पडून होते. सदर देयकांच्या मंजुरीसाठी २५ हजारांची लाच, तक्रारकर्ते मनोज गिते यांच्याकडे मागितली होती. या प्रकरणी लाचलुचपत खात्याकडे गिते यांनी मंगळवारी तक्रार दाखल केली होती. बुधवारी (दि. १८) खात्याचे पोलीस उपअधीक्षक नजीर शेख, हवालदार एस.जी. नाठे, एन.डी. गांगुर्डे, व्ही. बी. कंदीलकर यांनी पोलीस अधीक्षक शशीकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेश बदलून येवला पंचायत समिती परिसरातील बांधकाम विभागाच्या (इवद) उपअभियंता कार्यालयातील कॅबीनमध्ये प्रत्यक्ष
लाच स्वीकारतांना वाईकर यांना ताब्यात घेतले.
यापूर्वी ७ मार्च २०१४ रोजी तत्कालीन येवला प्रांतधिकाऱ्यांवर ही अशा प्रकारची कारवाई झाली होती. (वार्ताहर)

Web Title: Construction of Yavali sub-engineers caught in bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.