बांधकाम विभागाच्या अभियंत्याला कोठडी
By admin | Published: January 24, 2015 11:11 PM2015-01-24T23:11:07+5:302015-01-24T23:11:28+5:30
बांधकाम विभागाच्या अभियंत्याला कोठडी
सटाणा : तालुक्यातील धांद्रीपाडा येथील राखीव वनक्षेत्रात जेसीबीने झाडांची कत्तल करून अतिक्रमण केल्याप्र्रकरणी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला सटाण्यात अटक केली. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. वनविभागाच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. सटाणा वनपरीक्षेत्र हद्दीतील धांद्रीपाडा येथील गट क्र मांक ५० च्या राखीव वन क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता दिलीप काशीनाथ बच्छाव याने जेसीबीच्या साहाय्याने आवळा, कडुनिंब आदि लागवड केलेल्या वृक्षांची कत्तल करून अतिक्रमण केले. यामुळे वनखात्याचे सुमारे एक कोटी ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सुहास पाटील यांनी तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, संशियत आरोपी बच्छाव याने अटकपूर्व जामीनसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने शुक्र वारी रात्री उशिरा वनक्षेत्र अधिकारी पाटील यांनी बच्छाव यास अटक केली. (वार्ताहर)