महावितरणकडून वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहक जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 11:25 PM2022-03-07T23:25:55+5:302022-03-07T23:27:42+5:30

कळवण : तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावांमध्ये शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा आठ तासांऐवजी फक्त चारच तास मिळत असून, तोसुद्धा पूर्ण वेळ राहत नाही, त्यामुळे आंदोलन करून लक्ष वेधले जात असताना दुसरीकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा रॅली काढून वीजबिल भरणा करण्याचे आवाहन वीज ग्राहकांना करीत आहे.

Consumer Awareness Rally for Paying Electricity Bills from MSEDCL | महावितरणकडून वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहक जनजागृती रॅली

महावितरणच्या ग्राहक जनजागृती रॅलीत सहभागी घालेले रामराव राठोड, नितीन अंबडकर व कर्मचारी.

Next
ठळक मुद्देकळवण : ४१९३ ग्राहकांनी थकबाकी ; १४ कोटी ५३ लाख रुपयांचा केला भरणा

कळवण : तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावांमध्ये शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा आठ तासांऐवजी फक्त चारच तास मिळत असून, तोसुद्धा पूर्ण वेळ राहत नाही, त्यामुळे आंदोलन करून लक्ष वेधले जात असताना दुसरीकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा रॅली काढून वीजबिल भरणा करण्याचे आवाहन वीज ग्राहकांना करीत आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, मालेगावचे अधीक्षक अभियंता रमेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कळवणचे कार्यकारी अभियंता रामराव राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, उपकार्यकारी अभियंता नितीन अंबडकर यांनी महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांना आवाहन करण्यासाठी कळवण उपविभागीय कार्यालयापासून रॅलीचे आयोजन केले होते.
यावेळी रॅलीमध्ये वीजबिल भरणा करा, महावितरणला सहकार्य करा, वीज चोरी टाळा, नवीन कोटेशन घेऊन वीज पुरवठा सुरळीत करा, अशा विविध घोषणा दिल्या जात होत्या.

रॅलीत कृषिपंप, व्यावसायिक, घरगुती ग्राहक आदी ग्राहकांना महावितरणच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासन ऊर्जा विभाग व महावितरणद्वारे कृषी धोरण २०२० योजनेमध्ये कळवण तालुक्यातील कृषी ग्राहक १४६५३ पैकी ४६९३ ग्राहकांनी चालू व थकीत देयक भरणा करून सहकार्य केले आहे.
संबंधित योजनेंतर्गत योजना सुरू झाल्यापासून चालू देयक ३९० कोटी रुपये थकबाकी पोटी भरलेल्या रकमेमुळे मिळवलेली अतिरिक्त सूट रुपये १०.६२ कोटी रुपये आहे. ४१९३ ग्राहकांनी थकबाकी २१.२४ कोटी पैकी योजनेत चालू बिलात १४ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. महाराष्ट्र शासन व ऊर्जा विभागाकडून १० कोटी ६२ लाख रुपये देण्यात आले आहेत. एकूण थकबाकी ही ११२.२७ कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात येऊन शेतकरी बांधवांनी कृषिपंपावर कॅपेसिटर बसविण्याचे आवाहन अंबाडकर यांनी यावेळी केले.

या रॅलीत कनिष्ठ अभियंता जयेश मोरे, मेघराज बागुल, प्रवीण उगलमुगले, एस. एस. खुरकुटे, गजानन पगार, जयराम साबळे, हेमंत आहेर, पी. टी. गायकवाड, राजेश चौरे, किरण जाधव, युवराज निकम, मोहन पवार आदी सहभागी झाले होते.

Web Title: Consumer Awareness Rally for Paying Electricity Bills from MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.