ग्राहक दिन विशेष : ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणुकीची करता येणार तक्रार, ग्राहक कायद्यातील नव्या तरतुदीने लाभ 

By संजय पाठक | Published: December 24, 2020 06:01 AM2020-12-24T06:01:23+5:302020-12-24T06:01:56+5:30

Consumer Day Special: बदलत्या काळानुरूप त्यात अनेक प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषत: ग्राहक संरक्षणासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहेच; परंतु ग्राहक आता कोणत्याही ठिकाणाहून मंचाकडे थेट तक्रार करू शकतो.

Consumer Day Special: Online shopping fraud can be reported, benefiting from new provisions in the Consumer Law | ग्राहक दिन विशेष : ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणुकीची करता येणार तक्रार, ग्राहक कायद्यातील नव्या तरतुदीने लाभ 

ग्राहक दिन विशेष : ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणुकीची करता येणार तक्रार, ग्राहक कायद्यातील नव्या तरतुदीने लाभ 

googlenewsNext

-   संजय पाठक

नाशिक : नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात करण्यात आलेल्या बदलानुसार ऑनलाइन फसवणुकीची तक्रारदेखील नोंदवता येणार आहे. जेथे कोठे ग्राहक असेल तेथून तक्रार केल्यानंतर अन्य राज्यात असलेल्या ऑनलाइन शॉपिंग कंपनीला नोटीस बजावून कारवाई करता येऊ शकते. 
बदलत्या काळानुरूप त्यात अनेक प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषत: ग्राहक संरक्षणासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहेच; परंतु ग्राहक आता कोणत्याही ठिकाणाहून मंचाकडे थेट तक्रार करू शकतो. जिल्हा पातळीवर एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे दाखल करता येऊ शकतात. राज्य, जिल्हा आणि अगदी तालुका पातळीपर्यंत तक्रारपूर्व निराकरण अथवा समुपदेशनासाठी मंचाचीदेखील व्यवस्था आहे. 
कायद्यात तरतूद झाल्यानंतर २० जुलैपासून हा कायदा अस्तित्वात आला असला तरी राज्य सरकारकडून नवीन नियमावली आणि कार्यवाही अशा प्रकारचे काम मात्र झालेले नाही. 

केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायदा तयार केल्यानंतर त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. १९८६ साली देशात कायदा करण्यात आल्यानंतर तब्बल ३४ वर्षांनंतर सध्याच्या केंद्र सरकारने त्यात बदल केले आणि नवीन कायदा गेल्या २० जुलैपासून लागू करण्यात आला आहे. 

ही माेठी अडचण आहे 
- सध्या ऑनलाइन व्यवहार करणे आणि शाॅपिंग करण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, अशा व्यवहारात होणारी फसवणूक ही माेठी अडचण आहे. 
- आजवरच्या कायद्यात यासंदर्भात खूप मर्यादा होत्या, मात्र आता नवीन कायद्यात ई-मार्केटिंग आणि ई-सर्व्हिस प्रोव्हायडर्सलादेखील कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. 
- फसवणूक करणाऱ्यांसाठी दंड करता येत हाेता; परंतु आता नव्या कायद्यात कारावासाचीदेखील तरतूद केली आहे. 


नवीन ग्राहक कायद्यात यापूर्वी नसलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. ग्राहक संरक्षण हा विषय केंद्र आणि राज्य सरकारच्या सामाईक यादीत आहे. नवीन कायदा २० जुलैपासून लागू झाला असला तरी त्यानंतर राज्य सरकारकडून नवीन नियमावली आणि अन्य कार्यवाही करण्यात आलेली नाही. ती करणे गरजेचे आहे.
    - प्रा. दिलीप फडके, ज्येष्ठ कार्यकर्ते, ग्राहक हक्क चळवळ

Web Title: Consumer Day Special: Online shopping fraud can be reported, benefiting from new provisions in the Consumer Law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.