सहकारी बँकेवर प्रशासक नियुक्तीला ग्राहक पंचायतीचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:25 AM2021-02-18T04:25:20+5:302021-02-18T04:25:20+5:30
हुतात्मा स्मारक येथे ग्राहक पंचायतीची बैठक होऊन त्यात जिल्ह्यातील येवला, चांदवड, देवळा, मालेगाव येथील मर्चंटस् को-ऑप बँक, ...
हुतात्मा स्मारक येथे ग्राहक पंचायतीची बैठक होऊन त्यात जिल्ह्यातील येवला, चांदवड, देवळा, मालेगाव येथील मर्चंटस् को-ऑप बँक, दि फैज मर्कंटाइल को-ऑप बँक, श्रीगणेश सहकारी बँक, दि नाशिक डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल ॲण्ड मर्कंटाइल को-ऑप बँक, नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑप बॅक, समर्थ सहकारी बँक यासह अन्य बँकांवर पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ठेवीदार ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंतवणूक सभासद ग्राहक भयभीत झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांचा संबंधित बँकांचा सीडी रेशो, सीआरएआर, सीआरआर, एसएलआर थकबाकी प्रमाण विहित मर्यादेत नसल्याने सहकार खात्याने या बँकावर कारवाई केली आहे. अशा प्रकारची कारवाई जिल्ह्यात पहिल्यांदाच घडत असल्याची माहिती जिल्हा डिपॉझिटर्स फोरमचे अध्यक्ष श्रीधर व्यवहारे यांनी यावेळी दिली.
येणारे वर्ष आर्थिक बाबतीत खूप कठीण ठरणार आहे. एनपीओ मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या बँकांमधे मोठ्या प्रमाणात डिफॉल्टर सभासद आहेत. आपल्या बँका सुरक्षित असाव्यात, असे वाटत असेल तर ग्राहक पंचायत स्तरावर लक्ष ठेऊन वेळीच शासन स्तरावर पत्रव्यवहार करावा. सर्व थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करणे, एनपीएचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित बँक अधिकारी यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी कोअर कमिटीचे सहसंघटक ॲड. सुरेंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, प्रकाश जोशी, प्रशांत देशमुख, ॲड. राजेंद्र शेवाळे, उल्हास शिरसाट, भास्कर बोराडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.