दिंडोरी तालुक्यात रानभाज्यांना ग्राहकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:20 PM2020-09-10T23:20:37+5:302020-09-11T00:51:48+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतकर्यांनी पिकविलेल्या रानभाज्यांना शहरी भागासह तालुक्यात ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.

Consumer preference for legumes in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात रानभाज्यांना ग्राहकांची पसंती

दिंडोरी तालुक्यात रानभाज्यांना ग्राहकांची पसंती

Next
ठळक मुद्देशहरी भागात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतकर्यांनी पिकविलेल्या रानभाज्यांना शहरी भागासह तालुक्यात ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.
पाच ते सात वर्षांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील रानभाजीला जास्त कोणी मागणी करीत नव्हते. परंतु यंदा नाशिकला रानभाजी महोत्सव झाला आणि दिंडोरी, पेठ, सुरगाणा आदी तालुक्यातील रानभाजीला सुगीचे दिवस पाहायला मिळाले. रानभाज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे त्या आवर्जून खाल्ल्या जातात. कुलूची भाजी, कारटोली,कुरडू, टाकळ्याची भाजी, दिंडा,भारंग, फोडशी, शेवळं, नालेभाजी, अळु, सुरण, अनवे, अमरकंद, अळंबी, आघाडा, आचकंद,आलिंग, कडिकंदा, कडुकंद, कवदर, कवळी,काटेमाठ, कुड्याची फुले, कुसरा ,कोरड, कोलसने, कोळु, कौला, गेंठा, गोमाठी, घोळ, चाई, चायबळ, चावा,चिचारडी, चिंचुरडा, टाकळा, टेंबरण ,टेरा, तरोटा, तांदूळका, तांबोळी, देठा ,पंदा, भुईपालक ,भोकर, भोपळ्याची फुले, माठ, माड,मेके, मोहदोडे, रानकेळी, रानतोंडले, रानपुदीना, हळंदा, हादगा आदी भाज्यांना आता शहरी भागात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

1) रानभाज्यांची आवक कमी व मागणी जास्त वाढत असल्याने रानभाज्यांना भाव ही चांगला मिळत आहे.
2) प्रत्येक रानभाजीला साधारणपणे 30 ते 35 रुपये जुडी अथवा पाव किलोला भाव मिळतो आहे.
3) अति पावसामुळे रानभाज्या उगवण्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम
झाल्या त्यामुळे आवक कमी व मागणी जास्त आहे.
कोट
कोरोनाच्या कालखंडात रानभाजीचे सेवन महत्त्वाचे आहे. रानभाज्यांमध्ये पौष्टिक तत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती तयार होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या म्हणजे मानवाला निसर्गाची एक महान देणगीच आहे.
- ज्ञानेश्वर शेवरे, वांजोळे
(फोटो : 10लखमापूर1)

 

Web Title: Consumer preference for legumes in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.