लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी ग्राहकांचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:29 AM2019-10-27T00:29:57+5:302019-10-27T00:30:17+5:30
भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याचे दिसून आले.
नाशिक : भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याचे दिसून आले. धनत्रयोदशीनंतर चौथ्या शनिवारी सुटी असल्याने शासकीय, खासगी कर्मचारी तसेच औद्योगिक कामगारांनी सहकुटुंब बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्यामुळेरात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत गर्दी दिसून आली.
शहरात आठवडाभरापासून पावसाच्या वातावरणामुळे दिवाळीच्या खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याने शनिवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरणासोबतच टिपटिप पाऊस सुरू असला तरी ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. औद्योगिक वसाहत आणि खासगी आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना शनिवारपासून सुट्या असल्यामुळे कुटुंबातील सर्वांना कपडे, सजावटीचे साहित्य, लक्ष्मीमातेची प्रतिमा, मूर्ती, पूजा साहित्य, पणत्या, अकाशकंदील, केरसुनीसह किराणा, सुकामेवा, कपडे, खाद्यपदार्थ, भेटवस्तूंची ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. शहरातील बाजारपेठांसह विविध मॉलमधील सवलतीकडेही ग्राहक मोठ्या प्रमाणात आक र्षित झाल्याचे पाहायला आले. अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर घरातील टीव्ही, फ्रीज,वॉशिंगमशीन, एसीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी केली. त्याचप्रमाणे अनेकांनी दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी केली असून, अनेकांनी लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचे नियोजन केले आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चारचाकी वाहनांसोबतच व्यावसायिक वाहनांची खरेदी करणाºया ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
तयार फराळ, मिक्स मिठाईला मागणी
पारंपरिक दीपोत्सवाचा उत्साह घरोघरी दिसून येत असला तरी सध्याच्या काळात अनेक गृहिणी नोकरी, व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना फराळाचे पदार्थ करण्यासाठी वेळ मिळत नाही परिणामी मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकमध्येही तयार फराळ तसेच मिक्स मिठाई, काजू कतलीसह सर्वच मिठाईला मोठी मागणी असल्याचे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. कॉलनी किंवा सोसायटीत एकत्रित येऊन पदार्थ करण्यासोबतच आचाऱ्यांकडून फराळाचे पदार्थ तयार करून घेण्याचाही पर्याय वापरला गेला.
सराफ बाजाराला झळाळी
धनत्रयोदशीला नाशिकच्या सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने आणि चांदीच्या भांड्याची खरेदी केल्यामुळे कोट्यवधींची उलाढाल झाली. त्यामुळे सराफ बाजाराला झळाळी प्राप्त झाली असून, लक्ष्मीपूजनासाठी अनेक जणांनी सोनेखरेदीची तयारी केली आहे.
नवीन घरात लक्ष्मीपूजन
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपल्या स्वप्नातील घराची खरेदी केली असून, ज्या ग्राहकांना घराचा ताबा मिळाला आहे, त्यांनी आपल्या नवीन घरात लक्ष्मीपूजनाची तयारी केली आहे. त्याचप्रमाणे काही ग्राहकांनी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घराची बुकिंग करण्याचे नियोजन केले आहे.