अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी देशातील ११ कोटी कुटुंबांशी संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:29+5:302021-01-13T04:33:29+5:30
नाशिक : प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे, ही समस्त समाजाची इच्छा असल्याने समाजातील प्रत्येक घटकाचे त्यात योगदान लाभून ते सर्व ...
नाशिक : प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे, ही समस्त समाजाची इच्छा असल्याने समाजातील प्रत्येक घटकाचे त्यात योगदान लाभून ते सर्व भारतवासीयांचे मंदिर व्हावे, यासाठी देशभरातील किमान ११ कोटी कुटुंबांशी म्हणजेच जवळपास निम्म्या भारतवासीयांशी संपर्क साधून समर्पण निधी उभारण्यात येणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कुर्तकोटी शंकराचार्य न्यासच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत परांडे यांनी संक्रांतीपासून या देशव्यापी अभियानाला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले. या अभियानामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ४० हजार गावांमधील किमान १.५ कोटी कुटुंबांशी संपर्क साधून समर्पण निधी उभारला जाणार असल्याचे परांडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना महामंडलेश्वर हभप रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी हे अभियान कोणत्याही पक्षाचे नसून भगवंताच्या मंदिर निर्माणात आपले योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी संघचालक विजय कदम, विहिप जिल्हाध्यक्ष विराज लोमटे, प्रांत अभियान प्रमुख संजय मुद्राळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.