कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केवळ कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:12+5:302021-04-01T04:15:12+5:30

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानंतर गत दोन महिन्यात आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा आपसूकपणे सुस्तावत गेल्याचे चित्र ...

Contact tracing only on paper! | कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केवळ कागदावरच !

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केवळ कागदावरच !

Next

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानंतर गत दोन महिन्यात आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा आपसूकपणे सुस्तावत गेल्याचे चित्र होते, तर मार्च महिन्याच्या प्रारंभापासूनच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण २०पर्यंत वाढविण्याचे निर्देश असूनही यंत्रणाच अपुरी पडू लागल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार केवळ कागदावरच पार पाडला जात आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविल्या जात असलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या प्रमाणात वर्षाच्या प्रारंभापासून घसरण होऊन बहुतांश कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या प्रकाराची केवळ कागदोपत्री पूर्तता करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत दोन महिन्यांपासून घटले होते. त्यामुळे अनेक कोविड सेंटर्स बंद करण्यासह कोरोना विरोधातील लढाईत योगदान देणाऱ्यांनी काहीसा सुस्कारा टाकला होता. मात्र, मार्च महिन्याच्या प्रारंभापासून पुन्हा रुग्णवाढ दिसू लागल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. मात्र, काहीशा सुस्तावलेल्या यंत्रणेला पुन्हा कोरोना विरोधी लढ्यात सक्रिय करणे प्रशासनालादेखील अवघड जाऊ लागले. त्यामुळेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्यानंतर यंत्रणा सक्रिय करेपर्यंत कोरोनाचा वेग भयानक वाढल्याने सर्व कर्मचारी कोरोना तपासणी आणि लसीकरणाच्या कामातच विभागले गेले. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ट्रेसिंगच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे.

इन्फो

गतवर्षी किमान २५ जणांचे ट्रेसिंग

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्यांमध्येदेखील सुस्ती आली असून, आता पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने त्याला गती देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर या कोरोना तीव्रतेच्या काळात रुग्णांशी संबंधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचे ठरले होते. त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या २५ लोकांची तपासणी केली जात होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना नोव्हेंबरपासून यश मिळण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी राज्यात सर्वाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये नाशिक आघाडीवर होते.

इन्फो

आता केवळ कुटुंबाची तपासणी

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची थर्मामीटर व ऑक्सिमीटर तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेच्या शिक्षकांच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या या मोहिमेत घरोघरी फक्त आकडेवारी संकलित करताना आजारांची माहिती घेतली जात आहे. परंतु, गंभीर आजारांची माहिती संकलित करताना कोरोनाबाधित रुग्णांकडे दुर्लक्ष होते. घरोघरी भेटी दिल्यानंतर रुग्णांचे थर्मामीटर, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केली जात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सध्या तरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे हे प्रमाण कुटुंबातील व्यक्ती आणि शेजारच्या कुटुंबापुरते मिळून एकूण १०-१२ जणांपुरतेच मर्यादित झाले आहे.

--------------------

याप्रमाणेच डमी आहे.

( ही डमी आहे. )

Web Title: Contact tracing only on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.