राहुड घाटात कंटेनर, पिकअप कोसळून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:40 AM2018-11-12T01:40:32+5:302018-11-12T01:41:00+5:30
राहुड घाटात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या घाट उतारावरून कंटेनरच्या (क्र. आरजे १९ सीडी ४६४७) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो सरळ खाली जात असताना पुढे जाणाºया पिकअपवर (क्र. एमएच ०९ सीयू १२४८) जाऊन आदळला. यात कंटेनर व पिकअप दोन्ही वाहने घाटातील साठ फूट दरीत कोसळले. कंटेनरमध्ये गोण्या भरलेल्या होत्या. कंटेनर पिकअपवर जाऊन आदळल्याने पिकअपचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात पिकअपमधील बापू काळू निरभवणे (४०), रा. उगाव, ता. निफाड हे दबून मरण पावले, तर कंटेनर चालक मोहंमद शकील अब्दुल जब्बार सय्यद (५५), रा. कारीचक, ता. बिरपूर, जि. बेनुसाराय राज्य बिहार हा गंभीर जखमी आहे.
चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या घाट उतारावरून कंटेनरच्या (क्र. आरजे १९ सीडी ४६४७) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो सरळ खाली जात असताना पुढे जाणाºया पिकअपवर (क्र. एमएच ०९ सीयू १२४८) जाऊन आदळला. यात कंटेनर व पिकअप दोन्ही वाहने घाटातील साठ फूट दरीत कोसळले. कंटेनरमध्ये गोण्या भरलेल्या होत्या. कंटेनर पिकअपवर जाऊन आदळल्याने पिकअपचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात पिकअपमधील बापू काळू निरभवणे (४०), रा. उगाव, ता. निफाड हे दबून मरण पावले, तर कंटेनर चालक मोहंमद शकील अब्दुल जब्बार सय्यद (५५), रा. कारीचक, ता. बिरपूर, जि. बेनुसाराय राज्य बिहार हा गंभीर जखमी आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी, सोमा टोलचे कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केले. एक तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. जखमीवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.