गोंदे दुमाला फाट्यावर कंटेनर-ट्रकचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:20 AM2020-12-28T00:20:48+5:302020-12-28T00:21:08+5:30

नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे ट्रक आणि कंटेनर एकमेकांवर आदळल्याची घटना रविवारी (दि. २७) रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली.अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.

Container-truck accident at Gonde Dumala fork | गोंदे दुमाला फाट्यावर कंटेनर-ट्रकचा अपघात

गोंदे दुमाला फाट्यावर कंटेनर-ट्रकचा अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देमोठी दुर्घटना टळली : जीवितहानी नाही

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे ट्रक आणि कंटेनर एकमेकांवर आदळल्याची घटना रविवारी (दि. २७) रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली.अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. मुंढेगाव ते विल्होळी दरम्यान अपघातांची मालिका सुरुच असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे नाशिकहून - मुंबईकडे सिमेंट भरलेला अवजड ट्रक भरधाव वेगाने जात असताना ट्रक (क्र. एम.एच. १५, ई.जी.३८०२) समोर गतिरोधक असल्यामुळे चालकाने गाडीचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबले. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येत असलेल्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कंटेनरने (एम.एच. ४६, ए.आर.४४२१) ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनरच्या काचा फुटून नुकसान झाले. या परिसरात दिवसाआड होणाऱ्या अपघातामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याची मागणी होत आहे.
वाहनचालकांवर कारवाईची मागणी
बाजूलाच उपहारगृह, स्वीटस्‌ची दुकाने, भाजीपाला मार्केट तसेच या ठिकाणी गाड्यांचा थांबा असल्यामुळे प्रवासी येथे उभे असतात. सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अपघात टळला. गेल्या दोन आठवड्यांपासून मुंढेगाव ते विल्होळी दरम्यान दररोज या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असून, बेसुमार वाहन चालवणाऱ्या वाहचालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक तसेच प्रवासी करीत आहेत.

Web Title: Container-truck accident at Gonde Dumala fork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.