मौजे सुकेणेला कंटेनमेण्ट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:01 PM2020-05-18T22:01:03+5:302020-05-19T00:34:18+5:30
कसबे सुकेणे : आजवर कसबे सुकेणेच्या दहा किलोमीटर अंतरावर पोहोचलेला कोरोना गावाच्या वेशीवर धडकला असून, बाणगंगेच्या पलीकडे हाकेच्या अंतरावर मौजे सुकेणे येथे बाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारी (दि.१८) मौजे सुकेणेला कंटेनमेण्ट झोन जाहीर करण्यात आला असून, बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

सदर रु ग्ण सायन (मुंबई) येथे एका बँकेत नोकरीला आहे. तो १४ तारखेला मौजे सुकेणे येथे आल्यानंतर त्याला सर्दी व खोकला अशी लक्षणे दिसू लागली होती. त्यानंतर त्याने लागलीच स्वत:ला क्वॉरण्टाइन करत तपासणी करून घेतली. रविवारी (दि.१७) सायंकाळी साडेसात वाजता त्याचा अहवाल प्राप्त झाला.
------------------------
बाधित रुग्णावर गुन्हा दाखल
लॉकडाउन आदेशाचे उल्लंघन करून विनापरवानगी मुंबईहून मौजे सुकेणे येथे आलेल्या संबंधित कोरोनाबाधित रु ग्णावर कसबे सुकेणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा बाधित रु ग्ण हा मुंबईहून ई-पास न घेता गावी परतला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या बाधित रु ग्णावर लॉकडाउन कायदा उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली. नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन न करता ई-पास घेऊन स्थलांतर करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.