दूषित पाणीपुरवठ्याप्रश्नी नागरिकांनी विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:37+5:302021-06-16T04:20:37+5:30
शहरातील कुंभार गल्ली, पहिलवान गल्ली, मातंग वस्ती आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नगरपालिकेला ...
शहरातील कुंभार गल्ली, पहिलवान गल्ली, मातंग वस्ती आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नगरपालिकेला निवेदनही देण्यात आले आहे. मात्र, पालिकेने याप्रश्नी गांभीर्याने लक्ष न दिल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
नळाद्वारे आलेले दूषित पाणी बाटल्यांमध्ये भरून संतप्त नागरिकांनी सोमवारी (दि. १४) दुपारी नगर परिषद कार्यालय गाठले. उपमुख्य अधिकारी पाटील यांच्या दालनात जाऊन दूषित पाणी दाखवत आपली कैफियत मांडत जाब विचारला. उपमुख्य अधिकारी पाटील यांनी याप्रश्नी चौकशी करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी शकुंतला खैरनार, राजू विधाते, भगवान चित्ते, संतोष नागपुरे, नंदू पहिलवान, आकाश खैरनार आदींसह कुंभार गल्ली, पहिलवान गल्ली, मातंग वस्ती परिसरातील महिला उपस्थित होत्या.
फोटो- १४ येवला वॉटर
येवला येथे दूषित पाणीप्रश्नी उपमुख्य अधिकारी पाटील यांच्यासमोर कैफियत मांडताना महिला.
===Photopath===
140621\14nsk_38_14062021_13.jpg
===Caption===
फोटो- १४ येवला वॉटर दूषित पाणीप्रश्नी उपमुख्याधिकारी पाटील यांच्यासमोर कैफियत मांडतांना महिला.