पांढुर्ली विद्यालयात चिंतन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:26+5:302021-02-24T04:15:26+5:30
------------------------------------------------------- गुळवंचला शिवजयंती उत्सव सिन्नर : तालुक्यातील गुळवंच येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. ...
-------------------------------------------------------
गुळवंचला शिवजयंती उत्सव
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले, युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
-----------------------------
दोडीत रक्तदान शिबिराला प्रतिसाद
नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक येथे ब्रम्हा गुरूकुल क्लासेसच्या सहकार्याने व नाशिक बल्ड बॅँकेच्या मदतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी १०० जणांनी रक्तदान केले. शक्ती उगले, सुनील गर्जे, सचिन केदार यांनी परिश्रम घेतले.
----------------------------------------------------------
पेट्रोल दरवाढीमुळे वाहनचालकांना त्रास
सिन्नर : पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------------------------------------
कोरोना प्रादुर्भावामुळे पालकांत चिंता
सिन्नर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जिल्ह्यासह तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नुकतेच महाविद्यालयीन वर्ग सुरू झाले आहेत. तर यापूर्वी पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. रुग्णसंख्या वाढू लागल्याने आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे की नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रामवस्था आहे.
------------------------------------------------
तालुक्याचे सरपंच निवडीकडे लक्ष
सिन्नर : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या तालुक्यातील सरपंच,उपसरपंच निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहेत. तालुक्यातील तब्बल १०० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी दोन दिवसात होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.