संविधानाचा अवमान; आयुक्तालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:03 AM2018-08-28T01:03:19+5:302018-08-28T01:03:53+5:30
दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या श्रीनिवास पांडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.
नाशिकरोड : दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या श्रीनिवास पांडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. दिल्ली येथे संविधान जाळणाºया समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आदी विविध मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. उपायुक्त रघुनाथ गावडे यांना देण्यात निवेदनात म्हटले की, संविधानचा अवमान करणाºया श्रीनिवास पांडे यांचे नागरिकत्व रद्द करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, हरिष भंडागे, आकाश भालेराव, संदीप काकळीज, अनिल आठवले, विजय वाहुळे, बिपीन कटारे, बाळासाहेब साळवे, आबा डोके, सागर जाधव, सिध्दार्थ भालेराव, दिनेश जाधव, नाजाबाई सानवणे, शांताबाई पगारे, विमल तडवी, जयश्री जाधव, शांताबाई पगारे आदींच्या सह्या आहेत.
विविध मागण्या
हिंदुत्वादी सनातन संस्था, शिव प्रतिष्ठान संस्था यांच्यावर बंदी आणण्यात यावी. ए.व्ही.एम. मशीनवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, मागासवर्गीयांना खासगी क्षेत्रात आरक्षण मिळावे, बुद्धगया येथील महाबोध्दी बुध्दविहार बुध्दांच्या स्वाधीन करा, इंजिनिअर अभियंता शाखेतील विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.