सहा स्वाइन फ्लू संशयितांवर उपचार सुरू
By admin | Published: April 8, 2017 01:16 AM2017-04-08T01:16:12+5:302017-04-08T01:16:26+5:30
नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली असून, आतापर्यंत २१ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़
नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली असून, आतापर्यंत २१ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ तर जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सद्यस्थितीत सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, जिल्हाभर सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेमुळे रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे़
जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात गुरुवारपर्यंत पाच रुग्णांवर उपचार सुरू होते़ यामध्ये शुक्रवारी आणखी एका रुग्णाची भर पडली असून, रुग्णांची संख्या सहा झाली आहे़ यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर उर्वरित रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत़ दरम्यान, आरोग्य विभागातर्फे खेडोपाड्यात सुरू असलेल्या जनजागृती अभियानामुळे रुग्णांच्या संख्येत घट होते आहे़ (प्रतिनिधी)