मालेगाव परिसरात महिनाभरानंतर संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:18 AM2021-08-20T04:18:19+5:302021-08-20T04:18:19+5:30
मालेगाव तालुक्यात ९५ हजार हेक्टर क्षेेत्रावर शंभर टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. सध्या पडणारा पाऊस कापूस आणि मका पिकांना ...
मालेगाव तालुक्यात ९५ हजार हेक्टर क्षेेत्रावर शंभर टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. सध्या पडणारा पाऊस कापूस आणि मका पिकांना फायदेशीर आहे. गेल्या चोवीस तासात ३२ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात २२६ मिली पावसाची नोंद झाली आहे. बाजरी पक्व झाली असून, तिने फुलोरा धरला आहे. मूग काढणी झालेली आहे, त्यामुळे केवळ १० ते १५ टक्के नुकसान होऊ शकते.
दरम्यान, तालुक्यातील नद्यानाले अद्याप कोरडे असून, नद्यांना पाणी वाहिलेले नाही. मालेगाव शहरासह तालुक्यातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात ४१ टक्के जलसाठा झाला आहे. याशिवाय शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चणकापूर धरणात एक हजार २५९ दलघफू म्हणजे ५२ टक्के इतका, हरणबारी धरणात एक हजार १६६ दलघफू इतका आणि गिरणा धरणात सात हजार ६४७ दलघफू इतका जलसाठा झाला आहे. आणखी जोरदार पाऊस झाल्यास नद्यानाल्यांना पाणी येऊन धरणातील जलसाठा आणखी वाढणार आहे.