संततधारेने घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:56 PM2020-08-14T12:56:51+5:302020-08-14T12:57:17+5:30

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यात यंदाच्या वर्षी पावसाने आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.

Continuous damage to homes | संततधारेने घरांचे नुकसान

संततधारेने घरांचे नुकसान

Next

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यात यंदाच्या वर्षी पावसाने आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. तसेच नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कु-हे, नांदगाव बुद्रुक, आदीं परिसरात पावसाचा जोर वाढत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याच पाश्वर्भूमीवर या सतत चाललेल्या संततधारेमुळे नांदूरवैद्य येथे एका घराची भिंत कोसळल्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घराच्या बाजूला असलेला विद्युत पुरवठा करणाºया खांबाचे नुकसान झाले असून वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (दि.१३) रोजी घडली असून यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. सदर नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्यात येऊन भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त व्यक्तीने केली आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील रहिवाशी असलेल्या नंदाबाई शशिकांत रोकडे यांच्या घराचे सुरू असलेल्या संततधारेमुळे घराची भिंत कोसळून नुकसान झाले असून विद्युत पुरवठा करणाºया खांबाचे देखील नुकसान झाले असून वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याची घटना नांदूरवैद्य येथे घडली आहे. सुदैवाने या भिंतीमुळे व वीजवाहिन्या तुटल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान माञ मोठे झाले आहे. झालेल्या शेतकºयाला लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या नुकसानग्रस्त महिलेने केली आहे. यावर्षी सुरु झालेल्या पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील अनेक ठिकाणी शेतीला पुरेसा व मुबलक पाऊस पडत असल्यामुळे बळिराजाने समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यात देखील वाढ झाल्याने विसगर्ही सुरु आहे.

Web Title: Continuous damage to homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक