संततधारेचा जोर ओसरला; गंगापूरचा विसर्ग घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 09:23 PM2018-08-22T21:23:11+5:302018-08-22T21:26:49+5:30

दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवार व मंगळवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात १५ मि.मी. पाऊस पडला; मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी झाला.

The continuous thrust of the continuous subsistence; Gangapur's departure declined | संततधारेचा जोर ओसरला; गंगापूरचा विसर्ग घटला

संततधारेचा जोर ओसरला; गंगापूरचा विसर्ग घटला

Next
ठळक मुद्देगंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यास सुरुवात झालीसंध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक हजार ५६० क्युसेक इतका विसर्ग झाला होता.

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहर व परिसरात दमदार संततधार सुरू होती; मात्र बुधवारी सकाळी नऊ वाजेनंतर संततधारेचा जोर ओसरला. यावेळी काही काळ लख्ख ऊनही पडले होते. दिवसभर अधूनमधून हलक्या श्रावणसरींचा वर्षाव नाशिककरांना चिंब करत राहिला. संध्याकाळपर्यंत ९ मि.मी इतक्या पावसाची नोंद होऊ शकली.
दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवार व मंगळवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात १५ मि.मी. पाऊस पडला; मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी झाला. त्यामुळे दुपारी दोन वाजेनंतर गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यास सुरुवात झाली. दुपारी चार वाजेपर्यंत दोन हजार ६०० क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सुरू होता. एक हजार क्युसेकने विसर्ग कमी झाल्याने गोदावरीच्या पाण्याच्या पातळीतही घट होऊ शकली. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याखाली पाण्याची पातळी आली होती. दुपारी साडेचार वाजेपर्यंत नदीपात्रात अहल्यादेवी होळकर पुलाखालून ५ हजार ४३३ क्युसेक इतके पाणी प्रवाहित होते. पावसाचे प्रमाण संध्याकाळी कमी राहिल्याने होळकर पुलाखालूनही पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. तसेच गंगापूर धरणातून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक हजार ५६० क्युसेक इतका विसर्ग झाला होता. त्यामुळे गोदावरीला निर्माण झालेली पूरसदृश स्थिती संपुष्टात आली.


गंगापूर धरणाचा जलसाठा मंगळवारी ९५ टक्क्यांवर होता. विसर्ग बुधवारी दुपारपर्यंत साडेतीन हजार क्युसेकने सुरू राहिल्याने जलसाठा ९२.१७ टक्के झाला असून, ५ हजार ४३३ दलघफू इतका जलसाठा धरणात आहे. दिवसभर शहरात पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. पावसाच्या संततधारेने वाहतुकीचा वेगही मंदावला होता आणि बाजारपेठेतही शुकशुकाट जाणवत होता. बुधवारी बकरी ईदची शासकीय सुटी आणि पावसाच्या उघडीपीने नाशिककर संध्याकाळी कुटुंबासह घराबाहेर पडले. यामुळे शहरातील रस्ते, रेस्टॉरंट, बाजारपेठ, उद्याने गजबजली होती.

Web Title: The continuous thrust of the continuous subsistence; Gangapur's departure declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.