जनावरे पकडण्याचा ठेका लवकरच मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:11 AM2019-02-09T01:11:33+5:302019-02-09T01:11:57+5:30
गेल्या वर्षभरापासून नसलेला जनावरे पकडण्याच्या ठेक्याला आता मूर्त स्वरूप लागणार आहे. महापालिकेने मागविलेल्या निविदेला पाच मक्तेदारांनी प्रतिसाद दिला असून, याच महिन्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीवर प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक : गेल्या वर्षभरापासून नसलेला जनावरे पकडण्याच्या ठेक्याला आता मूर्त स्वरूप लागणार आहे. महापालिकेने मागविलेल्या निविदेला पाच मक्तेदारांनी प्रतिसाद दिला असून, याच महिन्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीवर प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरात मोकाट जनावरांंचा संचार वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात होता. विशेषत:
सिडकोत भल्या सकाळी एका शाळकरी मुलाला मोकाट गायी-बैलांनी अक्षरश: तुडवले. मोठ्या जिकरीने या मुलाचे प्राण वाचले असले तरी अन्य ठिकाणीदेखील अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने जुन्या
ठेकेदाराला तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यास सांगितले, तर
नव्याने निविदाही मागविल्या
होत्या. एकूण पाच निविदा प्राप्त झाल्या असून, लवकरच अंतिम निर्णयसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला जाणार
आहे.