सटाण्यात चिंंच घोटाळा निविदा काढण्यापूर्वीच ठेका : उपअभियंता, लेखापाल अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:09 AM2018-04-06T00:09:34+5:302018-04-06T00:09:34+5:30
सटाणा : कधी निकृष्ट दर्जाची रस्ताकामे, तर कधी कागदावरच डागडुजी अशा गैरकारभारामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सटाणा बांधकाम विभागाची यंत्रणा आता चिंच बहार घोटाळ्यात अडकली आहे.
सटाणा : कधी निकृष्ट दर्जाची रस्ताकामे, तर कधी कागदावरच डागडुजी अशा गैरकारभारामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सटाणा बांधकाम विभागाची यंत्रणा आता चिंच बहार घोटाळ्यात अडकली आहे. सटाणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील चिंचेच्या झाडांवरील फळ बहार उतरवल्यानंतर चिंच फळ बहार काढण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्याने उपअभियंत्यासह लेखापाल अडचणीत आले आहेत. या चिंच फळ बहार घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील प्रकाशा- छडवेल-विंचूर रस्ता किलोमीटर ११०/०० ते १४८/२००, अहवा-ताहाराबाद-नामपूर रस्ता किलोमीटर ३१/२०० ते ८५/००, मालेगाव-सटाणा रस्ता किलोमीटर ४१/२०० ते ६१/५३५, साक्री-नामपूर-मालेगाव रस्ता किलोमीटर १६३/७०० ते १६९/९०० या रस्त्यांच्या दुतर्र्फा असलेली चिंचेची झाडे आणि नामपूर, ताहाराबाद विश्रामगृह व सार्वजनिक बांधकाम विभाग स्टोअर सटाणा येथील आवारामधील चिंचेची दोनशेहून अधिक झाडांवरील फळ बहार काढण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात निविदा काढण्यात येते. या झाडांना मोठ्या प्रमाणात बहार येत असल्यामुळे तो उतरविण्यासाठी व्यापाºयांमध्ये चढाओढ असते. यंदा मात्र तब्बल दोन महिने उशिराने निविदा तर प्रसिद्ध केलीच; परंतु त्यापूर्वीच या झाडांवरील फळ बहार काढण्याचा ठेका आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला दिल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या ठेकेदाराचे चिंच फळ काढण्याचे काम सुरू असताना संबंधित विभागाने मात्र ४ एप्रिलला निविदा प्रसिद्ध करून १० एप्रिलला लिलाव ठेवला आहे.
परस्पर लावली जाते विल्हेवाट ..
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या या चिंच फळातून दरवर्षी लाखो रु पयांची उलाढाल होते. यापूर्वी उपअभियंता, लेखापाल आणि ठेकेदार यांच्या संगनमताने लिलाव प्रक्रि या पूर्ण केली जात होती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत निविदा पोहोचावी म्हणून शासन नियमानुसार शासकीय निविदा प्रसिद्ध करताना त्याची जिल्हा दैनिकात प्रसिद्धी करणे बंधनकारक आहे. मात्र या त्रिकुटाने अन्य ठेकेदारांना निविदेची निर्धारित वेळेत माहिती मिळू नये म्हणून मालेगावमधील एका सायंदैनिकात व साप्ताहिकामध्ये निविदा प्रसिद्ध करून चिंच फळ बहारची परस्पर विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले आहे.