पोलीस आयुक्तांचे पावरीवादन अन् नृत्यावर ठेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 01:08 AM2021-12-16T01:08:14+5:302021-12-16T01:09:24+5:30

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडे हे नेहमी चर्चेत राहणारे अधिकारी. कोरोना काळात त्यांनी ग्रीन ज्यूसचा उपक्रम राबविला, तर गोदावरीत राेज स्नान करीत नाशिककरांना गोदामाहात्म्य पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता दीपक पांडे यांनी कळवण तालुक्यातील काठरे दिगर येथे डोंगऱ्यादेव उत्सवाला हजेरी लावत चक्क आदिवासी नृत्यावर ठेका धरला, शिवाय पावरी वाद्यही वाजविण्याचा मोह त्यांना आवरला नाही. पांडे यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरला होत असून, लक्षवेधी ठरत आहे.

Contract on dance and dance of the Commissioner of Police | पोलीस आयुक्तांचे पावरीवादन अन् नृत्यावर ठेका

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी डोंगऱ्यादेव उत्सवात आदिवासी नृत्य करतानाच पावरी वादनाचाही आनंद लुटला. समवेत आमदार नितीन पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देकाठरे दिगर : कळवण तालुक्यात डोंगऱ्यादेव उत्सवाला सुरुवात

कळवण : नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडे हे नेहमी चर्चेत राहणारे अधिकारी. कोरोना काळात त्यांनी ग्रीन ज्यूसचा उपक्रम राबविला, तर गोदावरीत राेज स्नान करीत नाशिककरांना गोदामाहात्म्य पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता दीपक पांडे यांनी कळवण तालुक्यातील काठरे दिगर येथे डोंगऱ्यादेव उत्सवाला हजेरी लावत चक्क आदिवासी नृत्यावर ठेका धरला, शिवाय पावरी वाद्यही वाजविण्याचा मोह त्यांना आवरला नाही. पांडे यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरला होत असून, लक्षवेधी ठरत आहे.

कळवण तालुक्यात आदिवासींचे ग्रामदैवत असलेल्या डोंगऱ्यादेव उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. १४) रात्री आठ वाजता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काठरे दिगर या गावी डोंगऱ्यादेव उत्सवला भेट दिली व आदिवासी संस्कृतीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार उपस्थित होत्या.

 

काठरे दिगर येथे या उत्सवाला पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हजेरी लावली. यावेळी आदिवासी बांधवांनी पावरी नृत्य करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. पोलीस आयुक्त दीपक पांडे व आमदार नितीन पवार यांनीही पावरीच्या तालावर ग्रामस्थांसोबत ठेका धरला. दरम्यान, पांडे यांचा सत्कार सरपंच विजय गांगुर्डे यांनी पावरी वाद्य देऊन केला. यावेळी पांडे यांनाही पावरी वाद्य वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी पंचायत समिती सदस्य लालाजी जाधव, रघुनाथ महाजन, पोलीस पाटील राजाराम महाजन, एकनाथ जगताप, डी. एम. गायकवाड, राजू पाटील, अनिल घोडेस्वार, कैलास बहिरम ग्रामसेवक कपिल बिन्नर, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इन्फो

काय आहे डोंगऱ्यादेव उत्सव?

भारतीय लोकजीवनात कामना सिद्धीचे व्रते भरपूर आहेत; परंतु भारतीय लोक जीवनाचे एक अंग असलेल्या आदिवासी जमातीमध्ये अशी काही व्रते आहेत की, ती आचरणात आणण्यास अतिशय अवघड आहेत. मात्र, तरीसुद्धा पूर्वजांची परंपरा सतत पुढे चालत राहावी, आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून आजचा सुशिक्षित आदिवासीसुद्धा ही व्रते अगदी काटेकोरपणे तितक्याच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. आदिवासींच्या काही व्रतांपैकी एक व्रत म्हणजे ‘डोंगऱ्यादेव’ आहे. डोंगऱ्यादेव हा उत्सव तालुक्यातील कोकणा - कोकणी, भिल्ल, महादेव कोळी हा समाज संपूर्ण गाव एकत्रितरीत्या प्रत्येक गावाच्या प्रथेनुसार तीन किंवा पाच वर्षांनी साजरा करतात. हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या आमावस्येला सुरू होऊन मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते.

Web Title: Contract on dance and dance of the Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.