कंत्राटी वनमजूर कायम नोकरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:32 PM2019-06-25T18:32:46+5:302019-06-25T18:33:04+5:30

वनविभागाच्या वनविकास, रोहयो यासारख्या विविध सरकारी खात्यांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रोपे लावली जातात. त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजाही केला जातो. मात्र याच वृक्षलागवड केलेल्या वनांचे रक्षण करणाऱ्या राज्यातील हजारो हंगामी वनमजूर गत ३० वर्षांपासून कायम नोकरीच्या प्रतीक्षेत असून, संबंधित विभागाच्या अनास्था व लालफितीत अडकलेल्या फाइलींच्या प्रवासामुळे महाराष्ट्रातील जवळपास ५ हजार वनमजुरांचे कुटुंबे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत.

Contract wires are always waiting for the job | कंत्राटी वनमजूर कायम नोकरीच्या प्रतीक्षेत

कंत्राटी वनमजूर कायम नोकरीच्या प्रतीक्षेत

googlenewsNext
ठळक मुद्देलालफित : हजारो कुटुंबांची होतेय हेळसांड

पेठ : वनविभागाच्या वनविकास, रोहयो यासारख्या विविध सरकारी खात्यांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रोपे लावली जातात. त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजाही केला जातो. मात्र याच वृक्षलागवड केलेल्या वनांचे रक्षण करणाऱ्या राज्यातील हजारो हंगामी वनमजूर गत ३० वर्षांपासून कायम नोकरीच्या प्रतीक्षेत असून, संबंधित विभागाच्या अनास्था व लालफितीत अडकलेल्या फाइलींच्या प्रवासामुळे महाराष्ट्रातील जवळपास ५ हजार वनमजुरांचे कुटुंबे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत.
वनविभागाने केलेल्या वनीकरण क्षेत्रावर खºया अर्थाने संरक्षण करणारा शेवटचा घटक म्हणजे वनमजूर (वॉचमन). या वॉचमेनचा एक वेगळाच दरारा होता. अतिशय
खडतर व धोकेदायक समजल्या जाणाºया या सेवेत अनेकांनी कुंटुबांची गुजराण व्हावी म्हणून नोकरी मिळवली.
पाच-दहापासून पंचवीस वर्षांपर्यंत जंगलांचे संरक्षण करूनही या वनमजुरांना शासनाने केवळ रोजंदारी मजूर म्हणून संबोधले. शासकीय नियमानुसार कोणत्याही कर्मचाºयाने ५ वर्षापेक्षा अधिक सेवा केली असल्यास तो कायम सेवेसाठी पात्र होतो. मात्र वनमजुरांच्या बाबतीत राज्यात वेगवेगळे नियम लावण्यात येत असल्याचे दिसून येते.
२५-३० वर्षं सेवा करूनही कायम केले जात नसल्याने राज्यभर वनमजूर संघटित झाले. विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण यासारखे संघर्ष करून आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी लढा दिला जात असताना आता वरिष्ठांकडून अशा प्रकारच्या वनमजुरांची आवश्यकता आहे किंवा नाही अशा प्रकारचा स्पष्ट अहवाल सादर करण्याचे कार्यालयांना आदेशित केल्याने वनमजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
कायम सेवेचा चेंडू खालच्या कोर्टात
राज्यातील वनमजुरांना कायम करण्याबाबत कामगार संघटनाच्या माध्यमातून शासनावर दबाव टाकला जात असताना नागपूर मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने ३३३९ रोजंदारी वनमजुरांना कायम सेवेत दाखल करून घेण्यापूर्वी अशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे किंवा नाही, याबाबत स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न होणार या भीतीने वनमजुरांचा जीव टांगणीला लागला आहे.
सेवानिवृत्तीचे वय आले जवळ
४२५ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा करणाºया वनमजुरांना कधीतरी कायम सेवेत सामावून घेतील या आशेने बहुतांश वनमजुरांचे सेवानिवृत्तीचे वय उलटून गेल्याने कुटुंबाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. शासनाकडे वनमजूर प्रकारचे कोणतेही पद निर्माण करण्यात आले नसल्याने वर्षानुवर्ष सेवा करणाºया वनमजुरांची रोजंदारी मजुरांमध्ये गणना करण्यात आल्याने अशा कर्मचाºयांवर बेकारीची टांगती तलवार आहे.

Web Title: Contract wires are always waiting for the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.