कंत्राटी कर्मचाऱ्यांची पर्यटकांना दमबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:07 AM2018-09-14T01:07:34+5:302018-09-14T01:07:40+5:30
नाशिक : देशभर प्रसिद्ध असलेल्या पांडवलेणीच्या (त्रिरश्मी लेणी) प्रवेशद्वारावर कंत्राटी कर्मचाºयांकडून पर्यटकांना अरेरावी करत वादविवादाचे प्रसंग घडत असल्याने भारतीय पुरातत्व विभागाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पुरातत्व विभागाने पांडवलेणी परिसरात लेणींच्या व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाºयांकडूनच पर्यटकांसोबत वाद घालून अरेरावी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पांडवलेणी येथे फिरण्यासाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन युवकांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले असून, त्यांनी त्याची तक्रार थेट केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अपर सचिवांकडे ई-मेलद्वारे केली आहे.
पाथर्डी शिवारात महामार्गाला लागून असलेल्या त्रिरश्मी बौद्ध लेणीला दररोज शेकडो पर्यटक राज्यातून नव्हे तर देशभरातून आणि परदेशातूनही भेट देतात. नाशिकच्या पर्यटनामधील महत्त्वाचे प्रेक्षणीयस्थळ म्हणून पांडवलेणीचा समावेश होतो. शेकडो पायºया चढून आल्यानंतर पांडवलेणीच्या प्रवेशद्वारावर पुरातत्व विभागाकडून प्रवेश शुल्क आकारला जातो आणि पर्यटकांनी लेणीमध्ये प्रवेश केला की तेथे, गुंडप्रवृत्तीचे काही कंत्राटी कर्मचारी जे कुठल्याही गणवेशात नसतात आणि त्यांच्याकडे ओळखपत्रही नसून ते कर्मचारी अत्यंत उद्धटपद्धतीने पर्यटकांशी बोलतात.
महाविद्यालयीन युवक-युवतींच्या समूहासोबत जाणूनबुजून हे गुंड प्रवृत्तीचे कंत्राटी कर्मचारी वाद घालताना दिसून येत असल्याची तक्रार पर्यटकांनी अपर सचिवांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये केली आहे. या कंत्राटी कर्मचाºयांकडून पांडवलेणीच्या परिसरात भटकं ती केली जाते आणि तरुण पर्यटकांना हेतुपुरस्सर हटकून त्यांच्याशी शाब्दिक वादविवाद घालून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडे अशा प्रकारच्या घटना वाढल्याने पुरातत्व विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुरातत्व विभागाने येथे येणाºया पर्यटकांना नव्हे तर कंत्राटी कर्मचाºयांनाच शिस्त लावण्याची गरज असल्याची मागणी संतप्त नाशिककरांनी केली आहे. पुरातत्व विभागाने याबाबत लक्ष घालून अशा कर्मचाºयांना पांडवलेणीच्या बाहेरचा रस्ता दाखविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शिवीगाळीचा प्रयत्न
प्रेक्षणीयस्थळ पांडवलेणीच्या परिसरात भ्रमंतीसाठी आलेल्या नागरिकांची थट्टा करत खोड काढायची आणि महाविद्यालयीन युवक-युवतींच्या समूहाला उद्देशून टोमणे देत शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करायचा प्रताप येथील कंत्राटी उद्धट कर्मचाºयांकडून सुरू आहे. अशावेळी पर्यटकांपैकी कोणी त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला तर हे कर्मचारी त्याच्या अंगावर धावून जात मोबाइलसारख्या तत्सम वस्तू हिसकावून घेण्याचाही प्रयत्न करतात.