कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:39 AM2018-12-25T00:39:13+5:302018-12-25T00:39:39+5:30
राज्य सरकारने जाहीर के लेल्या मेगा भरतीपूर्वी सध्या विविध विभागांतील शासकीय सेवेत कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांचे समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी संघटना राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकुं द जाधवर व आयटक चे कामगार नेते राजू देसले यांनी दिली.
नाशिक : राज्य सरकारने जाहीर के लेल्या मेगा भरतीपूर्वी सध्या विविध विभागांतील शासकीय सेवेत कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांचे समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी संघटना राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकुं द जाधवर व आयटक चे कामगार नेते राजू देसले यांनी दिली.
कंत्राटी कर्मचाºयांच्या आंदोलनात दि. ९ जानेवारी २०१९ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे देण्यात येणार असून, राज्यात एकाचवेळी कामबंद करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. त्यानंतरही सरकारने कंत्राटी कर्मचाºयांच्या मागण्यांविषयी सकारात्मक भूमिका घेतली नाही तर नाशिक ते मुंबई असा मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे शरद कोळी, बाबासाहेब कोकाटे, शाहरुख मुलाणी, भगवान भगत, ओंकार जाधव, सचिन पाटील आदी उपस्थित होते.