ठेकेदाराक डून चौकीदारावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:07 AM2019-04-25T01:07:14+5:302019-04-25T01:07:31+5:30

थकविलेला पगार मागितल्याचा राग मनात धरून ठेकेदाराने चौकीदाराच्या थेट घरी जाऊन बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील गौतमनगर भागात घडली आहे.

 The contractor attacked the chieftain | ठेकेदाराक डून चौकीदारावर हल्ला

ठेकेदाराक डून चौकीदारावर हल्ला

Next

नाशिक : थकविलेला पगार मागितल्याचा राग मनात धरून ठेकेदाराने चौकीदाराच्या थेट घरी जाऊन बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील गौतमनगर भागात घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित ठेकेदाराविरुध्द तसेच कामगाराविरुध्द परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहे. एक ीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळे या देशाचे ‘चौकीदार’ असल्याचे सांगत असताना दुसरीकडे चौकीदारी करणाऱ्या सुरक्षारक्षकांची सुरक्षा वाºयावर असल्याचे पुन्हा अधोरेखित होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिषेक विनोद सिंग (रा.विकास कॉलनी, गौतमनगर) या कामगाराने दिलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की, संशयित विजय धनसिंग पवार (रा.राणाप्रताप चौक) हे चौकीदारांचा पुरवठा ठेकेदाराच्या आरएम सर्व्हिसेस आणि आराध्या सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यामातून सुरक्षारक्षकाचे काम करतो. संबंधित ठेकेदाराकडून वेळेवर वेतन अदा होत नसल्याने मंगळवारी (दि.२३) दुपारी काही सुरक्षारक्षकांनी त्यास गौतमनगर भागात बोलाविले होते. यावेळी संशयित पवार याने घर गाठले असता आपण त्यास कामगार नियमानुसार शासकीय सुविधा आणि थकीत वेतनाबाबत विचारणा केली. यावेळी संशयित विजय याने शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचे सिंग याने तक्रारीत म्हटले आहे.  या घटनेत सिंग या चौकीदाराच्या डोक्यात दगडी फरशीचा तुकडा मारल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विचारपूस केल्याने संताप
ठेकेदार विजय पवार यांनी दिलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की, कामगारांनी बोलाविल्यानुसार आपण विकास कॉलनीत गेलो असता दुचाकीची विचारपूस केल्याने संतप्त झालेल्या अभिषेक विनोद सिंग (रा.मुथा हॉस्पिटलमागे) या कामगाराने स्वत:च्या पगाराच्या पैशांवरून तसेच अन्य कामगारांच्या वेतनाची कुरापत काढून शिवीगाळ करीत गाडीवरून ढकलून दिले. या घटनेत डाव्या हाताच्या अंगठ्याचे हाड मोडले असल्याचे म्हटले आहे.

Web Title:  The contractor attacked the chieftain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.