‘त्या’ ठेकेदाराला अखेर महावितरणने ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:58 AM2019-11-09T00:58:25+5:302019-11-09T00:59:45+5:30
ग्राहकांना विहित मुदतीत वीज देयकांचे वाटप न करणाऱ्या ठेकेदाराचा प्रताप समोर आल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी संबंधित ठेकदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत ग्राहकांना वीज देयके न देण्याचा प्रकार यापूर्वीही घडला असल्याचे समोर आल्यामुळे संबंधित ठेकेदाराला कामकाज सुधारण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
नाशिक : ग्राहकांना विहित मुदतीत वीज देयकांचे वाटप न करणाऱ्या ठेकेदाराचा प्रताप समोर आल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी संबंधित ठेकदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत ग्राहकांना वीज देयके न देण्याचा प्रकार यापूर्वीही घडला असल्याचे समोर आल्यामुळे संबंधित ठेकेदाराला कामकाज सुधारण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात द्वारका उपविभागातील एका डीटीसीवरील सुमारे दीड ते दोन हजार ग्राहकांना वीजबिलांचे वाटपच करण्यात आले नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने दि. ७ रोजी उघडकीस आणला होता. ग्राहकांच्या वीज मीटरचे रीडिंग घेऊन त्यांना वीजबिल पोहोच करण्याची जबाबदारी ठेकेदाराला देण्यात आलेली आहे. महावितरणच्या बिलिंग विभागाकडून सप्टेंबर महिन्याचे वीजबील काढण्यात आले होते. मात्र ते ग्राहकांना वाटपच करण्यात आले नाहीत. त्यामुळे ग्राहकांना सप्टेंबरचे बिल भरता आले नाही. काही ग्राहकांनी आॅनलाइन बिले पाहून रक्कम भरली. परंतु प्रत्यक्षातील बील मिळाले नसल्याने नियमित होणारा बिलांचा भरणा होऊ शकला नसल्याने महाविणरणला आर्थिक फटका बसला. त्यामुळे महवितरणने ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याची कार्यवाही सुरू केली. ठेकेदाराची चूक असताना ग्राहकांना त्रास होऊ लागल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
वास्तविक वीजबिले मिळाले नसल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी महावितरणच्या तिगरानिया येथील कार्यालयात केली होती. वीजजोडणी तोडण्यासाठी जाणाºया कर्मचाºयांकडेदेखील कर्मचारी बिले मिळत नसल्याची कैफियत मांडत होते. परंतु ठेकेदारावर कोणताही ठपका न ठेवता थेट ग्राहकांवर कारवाई करण्यात येत असल्याने सुमारे दीड ते दोन हजार ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. नोव्हेंबर महिन्यात ग्राहकांना सप्टेंबर आणि आॅक्टोबर अशा दोन्ही महिन्यांची बिले देतांना सप्टेंबरचे बिल भरले नाही
ठेकेदारावर आता काउंटर ‘वॉच’
ग्राहकांना विहित मुदतीत वीज देयके दिली जात असल्याच्या तक्रारींची व्याप्ती वाढल्याने महावितरणकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली आहे. संबंधित ठेकेदाराला कामकाज सुधारणाची ताकीद देण्यात आली आहेच, शिवाय ग्राहकांना देयके वेळेत दिले आहे की नाही हे पाहण्यासाठी महावितरणचे अधिकारी अचानक ग्राहकांना भेटी देऊन चौकशी करणार आहेत. अशावेळी ग्राहकांनी काही तक्रारी केल्यास त्याची नोंददेखील घेतली जाणार आहे.
कर्मचारी संख्या वाढविण्याची सूचना
ग्राहकांना वेळेत वीज देयके उपलब्ध व्हावेत आणि देयक भरणा करण्याच्या तारखेपूर्वी देयक मिळावे यासाठी ठेकेदाराने आपल्याकडील कर्मचाºयांची संख्या वाढवावी आणि त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा, अशा सूचनादेखील ठेकेदाराला करण्यात आल्या आहेत. ठेकेदाराकडील कर्मचारी सक्षमपणे आणि गांभीर्याने कामकाज करीत नसतील तर अशा कर्मचाºयांना काढून टाकण्याची ताकीदही ठेकेदाराला देण्यात आली असल्याचे समजते.