रस्ता दुपदरी करताना ठेकेदाराचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 06:12 PM2022-04-18T18:12:25+5:302022-04-18T18:12:56+5:30

मनमाड : शहरातून जाणाऱ्या चांदवड - मनमाड - जळगाव राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम जोमात सुरू आहे. नांदगाव ते मनमाड दुपदरी करण्याचे काम अति वेगाने सुरू असले तरी संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन महिन्यात अनेक अपघात घडले आहेत.

Contractor's negligence while paving the road | रस्ता दुपदरी करताना ठेकेदाराचा हलगर्जीपणा

रस्ता दुपदरी करताना ठेकेदाराचा हलगर्जीपणा

Next
ठळक मुद्देमनमाड : काम वेगाने, पण दोन महिन्यात अपघातांची मालिकाच

मनमाड : शहरातून जाणाऱ्या चांदवड - मनमाड - जळगाव राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम जोमात सुरू आहे. नांदगाव ते मनमाड दुपदरी करण्याचे काम अति वेगाने सुरू असले तरी संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन महिन्यात अनेक अपघात घडले आहेत.
संबंधित ठेकेदाराने योग्य जागी योग्य फलक लावले नसल्याने रात्रीच्या सुमारास अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास दुचाकीस्वार घरी जाण्यासाठी मनमाडहून पानेवाडीकडे निघाला असताना येथील बुरकूवाडीजवळ सुरू असलेल्या पुलाच्या खोदलेल्या कामात पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

मनमाड ते नांदगाव या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण काम होत आहे. मात्र, जागोजागी खडीचे ढिगारे व पुलाचे नवीन खोदकाम यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पुलाच्या सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिकेट किंवा काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक लावले नसल्याने ते अपघाताला आमंत्रण ठरत आहे.

गेल्या दोन महिन्यात दहाहून अधिक अपघात झाले आहेत. रात्री पानेवाडी येथील बाळू आव्हाड हे मनमाडहून पानेवाडी घराकडे जात असताना रात्रीच्या वेळेस अचानक पुलाचे खोदकाम करून ठेवल्याने ते सरळ त्या खोदकामात खोलवर मोटारसायकलसह पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
दरम्यान, संबंधित ठेकेदाराविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. मात्र, रोडच्या संबंधित ठेकेदाराने काम सुरू असताना तेथे बॅरिकेट किंवा काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक लावले नसल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या परिसरातील वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.
(१८ मनमाड)

नांदगाव ते मनमाड रस्ता दुपदरीकरणाचे सुरु असलेले काम.

Web Title: Contractor's negligence while paving the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.