कंत्राटी वाहनचालकांचे वेतन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:00 AM2018-11-17T01:00:38+5:302018-11-17T01:00:59+5:30

जिल्हा परिषदेतील जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांचे तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन त्वरित देण्यात यावे तसेच कनिष्ठ सहायक लिपिकावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांना दिले.

The contractual wages of the contract drivers are tired | कंत्राटी वाहनचालकांचे वेतन थकले

कंत्राटी वाहनचालकांचे वेतन थकले

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : कामगार संघटनांकडून आंदोलनाचा इशारा

नाशिक : जिल्हा परिषदेतील जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांचे तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन त्वरित देण्यात यावे तसेच कनिष्ठ सहायक लिपिकावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांना दिले.
मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. गरोदर मातेस व एक वर्षाखालील आजारी बालकास घरापासून रुग्णालयापर्यंत तसेच रुग्णालयापासून घरापर्यंत मोफत वाहतूक सेवा या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत राबविली जाते. नाशिक जिल्ह्यातील जवळपास ६४ वाहनचालक हे जननी शिशु सुरक्षा कार्यक्र माअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. परंतु त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मोबदला मिळालेला नाही. भोपाळच्या मे. अशकोम मेडिया इंडिया प्रा.लि., या कंपनीकडे वाहनचालक पुरविण्याचे कंत्राट असून, आॅगस्ट महिन्यापासून वाहनचालकांना त्यांचे वेतन मिळालेले नाही. कामगारांच्या पगाराची तजवीज करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी पार न पाडल्याने वाहनचालकांची दिवाळीही अंधारातच गेली. याची दखल घेत शिवराज ओबेरॉय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना निवेदन दिले.



मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी मुकेश शेवाळे, गणेश पवार, अनिकेत कपोते, अनिल ठाकरे, प्रशांत पाटील, अक्षय खंदारे, रवि बोरसे आदी पदाधिकाºयांसह ठगाराम गायकवाड, महेश बेंडकुळे, चेतन जाधव, भाऊसाहेब गुळवे, भास्कर गायकवाड, रामलाल जाधव, उत्तम पवार, सिद्धार्थ सुपारे, मोठाभाऊ पवार, समाधान शेवाळे आदी वाहनचालक उपस्थित होते.

Web Title: The contractual wages of the contract drivers are tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.