काजवा महोत्सवावर वन्यजीव विभाग आणणार नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:45 AM2019-06-12T01:45:10+5:302019-06-12T01:46:38+5:30

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पावसाळ्याच्या प्रारंभी काजव्यांची चमचम बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांची झुंबड उडते. रात्रीच्या वेळी अभयारण्यात लोटणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन्यजीव विभागाकडून पुढील वर्षापासून काजवा महोत्सवाची नियोजनबद्ध आखणी करण्यात येणार आहे.

Control of bringing wildlife department on the Festival of Kajwa | काजवा महोत्सवावर वन्यजीव विभाग आणणार नियंत्रण

काजवा महोत्सवावर वन्यजीव विभाग आणणार नियंत्रण

googlenewsNext
ठळक मुद्देवन्यजीव, एमटीडीसीच्या बैठकीत निर्णयखासगी वाहनांवर निर्बंध : ‘पिक अ‍ॅण्ड ड्रॉप’ची देणार सुविधा

नाशिक : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पावसाळ्याच्या प्रारंभी काजव्यांची चमचम बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांची झुंबड उडते. रात्रीच्या वेळी अभयारण्यात लोटणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन्यजीव विभागाकडून पुढील वर्षापासून काजवा महोत्सवाची नियोजनबद्ध आखणी करण्यात येणार आहे. दरम्यान, खासगी वाहनांना अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही. केवळ वन्यजीव विभागाच्या अधिकृत मिनीबसेसचा पर्याय पर्यटकांना उपलब्ध करून दिला जाईल. पर्यटकांना ठरावीक वेळेत ‘पिक अ‍ॅण्ड ड्रॉप’ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी बोलविलेल्या बैठकीत घेण्यात आला.
मागील काही वर्षांपासून भंडारदरा वनपरिक्षेत्रातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पावसाळापूर्व काजवा महोत्सव नावारूपाला आला आहे. अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबईसह गुजरात राज्यातूनही पर्यटक काजवे बघण्यासाठी या भागात गर्दी करू लागले आहे. सध्या वन्यजीव विभागाकडून प्रती वाहनासह व्यक्तीचे प्रवेश शुल्क आकारून अभयारण्य क्षेत्रात प्रवेश दिला जात आहे. या महोत्सवातून मिळणाºया महसुलाचा काही भाग अभयारण्य क्षेत्रातील गावांच्या विकासावर खर्च केला जातो. पुढील वर्षापासून अभयारण्यात पर्यटकांचा गोंगाट, बेशिस्तपणा, वाहतूक कोंडी या समस्यांवर मात केली जाणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी करून वन्यजीव विभाग पर्यटकांची मिनीबसेसमधून ने-आण करणार आहेत. या बसेसच्या फेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित करून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. यामुळे पर्यटकांसह वाहनांची अभयारण्यात एकाच वेळी होणाºया गर्दीवर नियंत्रण येणार असल्याचा विश्वास अंजनक यांनी व्यक्त केला. मंगळवारी (दि.११) शहरातील ‘अरण्य संकुल’मधील वन्यजीव विभागाच्या मुख्य कार्यालयात पर्यटन विकास महामंडळ अधिकाºयांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहायक वनसंरक्षक शिवाजी ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी डी.डी. पडवळे, अमोल आडे, एमटीडीसीचे महेश बागुल आदी उपस्थित होते. बैठकीसाठी ट्रॅव्हल्सचालकांच्या ‘तान’संघटनेलाही निमंत्रण देण्यात आले होते; मात्र त्यांच्याकडून कोणीही उपस्थित राहिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रवेशनाक्यांपासून असणार बसेस
पुढील वर्षापासून काजवे बघण्यासाठी येणाºया पर्यटकांना त्यांची वाहने वन्यजीव विभागाने निश्चित केलेल्या वाहनतळातच उभी करावी लागणार आहेत. वाहनतळापासून अभयारण्याच्या प्रवेशनाक्यापर्यंत वन्यजीव विभागाने अधिकृत परवानगी दिलेल्या स्थानिक टॅक्सी, जीपचालकांकडून आरटीओ नियमानुसार पर्यटकांची वाहतूक केली जाईल. प्रवेशनाक्यावरून अधिकृत वन्यजीव विभागाचे फलक असलेल्या मिनी बसेसमधून पर्यटकांना अभयारण्यात जाता येणार आहे.

Web Title: Control of bringing wildlife department on the Festival of Kajwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.