वादग्रस्त कारकीर्द : पोलिसांतही गुन्हे दाखलबागलाणचे तहसीलदार सैंदाणे तिसºयांदा निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:37 AM2017-12-22T01:37:14+5:302017-12-22T01:37:54+5:30

नाशिक : बागलाणचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरली असून, आजपावेतो ते विविध प्रकरणांत दोषी आढळून तीन वेळा सेवेतून निलंबित झाले आहेत.

Controversial career: Tandhilildar Saina for criminal offense pending for third term | वादग्रस्त कारकीर्द : पोलिसांतही गुन्हे दाखलबागलाणचे तहसीलदार सैंदाणे तिसºयांदा निलंबित

वादग्रस्त कारकीर्द : पोलिसांतही गुन्हे दाखलबागलाणचे तहसीलदार सैंदाणे तिसºयांदा निलंबित

Next
ठळक मुद्देअसमाधानकारक कामकाजआयुक्त महेश झगडे यांच्यावर ताशेरे

नाशिक : बागलाणचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरली असून, आजपावेतो ते विविध प्रकरणांत दोषी आढळून तीन वेळा सेवेतून निलंबित झाले आहेत. त्यांच्या निलंबनाची विधिमंडळाच्या अधिवेशनात घोषणा झाली असली तरी, रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाला त्याबाबतचे आदेश प्राप्त झालेले नाहीत.
तहसीलदार सुनील सैंदाणे यांची तीन महिन्यांपूर्वीच विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी बदली केली होती. आमदार दीपिका चव्हाण यांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे तसेच सैंदाणे यांच्या असमाधानकारक कामकाजाच्या आधारे त्यांची नागपूर विभागात बदली करण्यात आली होती. परंतु सैंदाणे यांनी विभागीय आयुक्तांच्या या बदली आदेशाविरुद्ध मॅटमध्ये धाव घेतली होती व चुकीच्या पद्धतीने बदली करण्यात आल्याची तक्रार केली होती. सैंदाणे यांच्या अर्जावर मॅटमध्ये सुनावणी घेण्यात आली असता, मॅटने सैंदाणे यांच्या बाजूने निकाल दिला, तसेच हा निकाल देताना महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव व विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्यावर ताशेरे ओढले होते त्यामुळे महसूल खात्याने सैंदाणे यांची कृती अधिक गांभीर्याने घेतली होती. मॅटचा निकाल बाजूने लागल्यावर सैंदाणे यांनी पुन्हा बागलाण तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली होती. तत्पूर्वी ज्यावेळी सैंदाणे नायब तहसीलदार म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले त्यावेळी त्यांच्याकडे नाशिकच्या शासकीय धान्य गुदामाचे गुदामपाल म्हणून पदभार होता. त्याकाळी पुरवठा खात्यातील एकूणच गैरव्यवहाराच्या प्रकरणात सुनील सैंदाणे दोषी आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ते सेवेत दाखल झाले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात असमाधानकारक काम केल्याच्या कारणावरून सैंदाणे यांना तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी निलंबित केले होते. सैंदाणे पुन्हा सेवेत रुजू झाले त्यानंतर त्यांची सरदार सरोवर प्रकल्पात बदली करण्यात आली होती. तेथून सैंदाणे यांनी सिन्नर तहसीलदार म्हणून काही काळ कामकाज पाहिले, परंतु तेथेही ते वादग्रस्त ठरले. त्यांच्या कामकाजाविरुद्ध अलीकडेच काही शेतकºयांनी उपोषण आंदोलनही केले. दोनदा सेवेतून निलंबित झाल्यानंतर सैंदाणे यांच्या कामकाजात सुधारणा होण्याऐवजी चुकाच अधिक झाल्याने विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी त्यांची बदली केली, परंतु मॅटने दिलासा दिल्यावर ते सेवेत दाखल झाले. मात्र स्थानिक आमदारांशी त्यांचे असलेले वैमनस्य कमी होऊ शकले नाही, परिणामी विधिमंडळाने हक्कभंग मान्य करून सैंदाणे यांच्या निलंबनाची घोषणा केली.
शासकीय व खासगी कारकीर्द वादग्रस्त
तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्यावर पत्नीचा छळ केल्याचा तसेच मारहाण करून घरातून हाकलून दिल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल असून, त्यानंतरही पत्नीला धमकाविल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सैंदाणे यांच्याकडून होणाºया छळापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांच्या पत्नीने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांपासून ते थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सैंदाणे यांची शासकीय व खासगी कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.

Web Title: Controversial career: Tandhilildar Saina for criminal offense pending for third term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.