सटाण्यातील ‘ती’ वादग्रस्त भिंत अखेर उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:17+5:302021-05-29T04:12:17+5:30
सुमारे ४ वर्षांपूर्वी सटाणा शहरातील काही नागरिकांना एकत्र येऊन श्री समर्थ गृहनिर्माण संस्थेची नोंदणी केली. मालेगाव रोडवर जागा घेऊन ...
सुमारे ४ वर्षांपूर्वी सटाणा शहरातील काही नागरिकांना एकत्र येऊन श्री समर्थ गृहनिर्माण संस्थेची नोंदणी केली. मालेगाव रोडवर जागा घेऊन बंगले बांधले व मध्य भागातून कॉलनी रोड ठेवला. पूर्वी त्या परिसरात आजूबाजूला शेती असल्यामुळे कॉलनी रोडच्या उत्तर बाजूस रस्त्यावर भिंत बांधून रोड बंद केला गेला. मात्र, आता त्या परिसरात प्लॉट पडल्यामुळे कॉलनी रोड वापरण्याची गरज निर्माण झाली. तेव्हा श्री समर्थ गृहनिर्माण संस्थेने कॉलनी रोड खासगी आहे. नगर परिषदेचा त्याच्याशी संबंध नाही अशी भूमिका घेतली व रस्त्यावर बांधलेली भिंत काढून घेण्यास नकार दिला होता. काही नागरिक शासनाकडे गेले, तेव्हा नगरविकास राज्यमंत्री यांनीही सदरची भिंत पाडून टाकण्याचा आदेश दिला. तरीही संस्थेने भिंत काढली नाही. त्यामुळे नगर परिषदेने संस्थेला भिंत काढून घेण्याबाबत नोटीस बजावली. तेव्हा संस्थेने नोटीस बेकायदेशीर आहे, असे सांगून न्यायालयात धाव घेतली व तात्पुरता मनाई हुकूम घेतला होता.
इन्फो
न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
चौकशीअंती न्यायालयाने कॉलनी रोडवर बांधलेली भिंत काढून टाकण्यास नगरपालिकेला अधिकार असल्याचा निकाल दिल्याने नगरपालिकेच्या नगररचना विभागाचे प्रमुख धनंजय अहिरे, अभियंता शालिमार कोर, रमेश धोंडगे यांच्या उपस्थितीत सदरची भिंत गुरुवारी (दि. २७ ) सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस नाईक जिभाऊ पवार, पोलीस नाईक नवनाथ पवार, अजय महाजन, भोईर यांच्या कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात आला.
फोटो- २८ सटाणा वॉल
सटाणा येथील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भागात सोसायटीच्या कॉलनी रोडवर अतिक्रमण करून बांधलेली भिंत जेसीबीने हटवताना नगरपालिकेचे कर्मचारी.
===Photopath===
280521\28nsk_28_28052021_13.jpg
===Caption===
फोटो- २८ सटाणा वॉल सटाणा येथील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भागात सोसायटीच्या कॉलनी रोडवर अतिक्रमण करून बांधलेली भिंत जेसीबीने हटवताना नगरपालिकेचे कर्मचारी.