वादग्रस्त बोगदा अखेर खुला

By admin | Published: March 9, 2016 12:15 AM2016-03-09T00:15:14+5:302016-03-09T00:19:07+5:30

रात्री दहाचा ‘मुहूर्त’ : वाहतुकीच्या पुनर्विचाराकरिता पोलिसांचा निर्णय

The controversial tunnel finally opens | वादग्रस्त बोगदा अखेर खुला

वादग्रस्त बोगदा अखेर खुला

Next

 नाशिक : वाहतूक कोंडी व अपघाताचे कारण दाखवून पोलीस आयुक्तांनी गत आठ महिन्यांपासून बंद केलेला मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगरचा बोगदा पंधरवड्यासाठी का होईना, मंगळवारी (दि.८) रात्री दहा वाजता खुला करण्यात आला. मोर्चे, आंदोलने व नागरिकांची निवेदने, राजकीय पक्षांचा पाठपुरावा यामुळे बोगदा खुला करण्याबाबत प्रशासनावर दबाव वाढला होता. दरम्यान, पंधरा दिवसांच्या वाहतुकीचा आढावा घेऊन याबाबत नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण पोलीस प्रशासनाने दिले आहे.
१२ जुलै २०१५ सालापासून इंदिरानगर बोगदा शहर पोलीस वाहतूक शाखेने वाढते अपघात व वाहतुकीची होणारी कोंडी रोखण्यासाठी बंद केला होता. यासाठी जनतेच्या सूचना व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या तंत्रज्ञांच्या समितीच्या अहवालानुसार शहर वाहतूक शाखेने बोगदा बंद करण्याचा निर्णय घेत सुरक्षित वाहतुकीसाठी हा अनोखा पर्याय शोधला होता.

Web Title: The controversial tunnel finally opens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.